आदर्श समाज निर्माण होण्याकरिता आदर्श शाळा आवश्यक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:14+5:302021-07-27T04:38:14+5:30
कुरखेडा येथील विकास विद्यालयात रविवारी शाळेतील माजी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत ...
कुरखेडा येथील विकास विद्यालयात रविवारी शाळेतील माजी व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व वृक्षारोपण करण्यात आले. याप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. याप्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून गोंविदराव मुनघाटे महाविद्यालयाचे प्रा. डॉ. नरेंद्र आरेकर, माजी जि.प.सदस्य तथा सेवानिवृत्त प्राचार्य पी. आर. आकरे, गोंडवाना विद्यापीठाचे सिनेट सदस्य चांगदेव फाये, प्रा गणेश सातपुते, उल्हास महाजन, उदयलाल कोचे,अयुब पठाण, गजानन जल्लेवार, किशोर खुणे, रूपेश सोनकुसरे, गुणवंत फाये, मनीष फाये, लक्ष्मण धुळसे, भास्कर बन्सोड, तुषार कुथे, आशू रामचंदानी, संकेत मनुजा, मुख्याध्यापक रवींद्र अलगदेवे, शिक्षक व शिक्षतेतर कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव उल्हास महाजन, संचालन शिक्षक मुकेश खोबरागडे तर आभार मुख्याध्यापक रवींद्र अलगदेवे यांनी मानले.
बाॅक्स
हे आहेत गुणवंत व माजी विद्यार्थी
इयत्ता १० वीच्या परीक्षेत शाळेतून प्रथम स्थान प्राप्त अमित कविदास नरोटे व द्वितीय क्रमांक पटकाविणारा मोहित विक्रम बोदेले यांचा स्मृतिचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन सत्कार करण्यात आला. कार्यक्रमात शाळेचे माजी विद्यार्थी व भारतीय स्टेट बँक शाखा कुरखेडा येथील शाखाधिकारी योगेश्वर डोंगरवार, माजी ग्रामपंचायत सदस्य तथा पत्रकार सिराज पठाण यांचा संस्थेच्यावतीने शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
260721\img-20210726-wa0092.jpg
एस बी आय शाखाधिकारी योगेश्वरजी डोगंरवार यांचा सत्कार करताना मान्यवर