जंगलांचा जिल्हा म्हणून ओळख कायम राहावी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 27, 2021 04:38 AM2021-07-27T04:38:23+5:302021-07-27T04:38:23+5:30
जंगल कामगार सहकारी संस्था वैरागडच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अभिदान वितरण समारंभ वैरागड येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ...
जंगल कामगार सहकारी संस्था वैरागडच्या वतीने १० टक्के समाजकल्याण अभिदान वितरण समारंभ वैरागड येथे आयोजित करण्यात आला होता याप्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जंगल कामगार सहकारी संस्था जिल्हा संघाचे अध्यक्ष माजी आ. हरिराम वरखडे होते. प्रमुख अतिथी म्हणून जिल्हा संघाचे उपाध्यक्ष पूर्णचंद्र रायसिडाम, वैरागड जकास संस्थेचे अध्यक्ष माजी आ. डॉ. रामकृष्ण मडावी, उपाध्यक्ष हरिचंद्र गेडाम, संस्थेचे संचालक केशव गेडाम, भास्कर बोडणे, एम. के. खोबरागडे, श्रावण नागोसे, उमाजी पेंदाम, गोपाल हलामी, शंकर चौधरी, सुनंदा वटी, आरमोरी पं. स. चे उपसभापती विनोद बावनकर, सरपंच संगीता पेंदाम, माणिक सिडाम, पोलीस पाटील गोरखनाथ भानारकर, शिवसेनेचे राजू अंबानी, शिवसेनेचे तालुका अध्यक्ष महेंद्र शेंडे, संस्थेचे माजी संचालक सुखदेव बोडणे, माजी उपसरपंच श्रीराम आहीरकर, रमेश बोडणे, महादेव दुमाने, प्रतिमा बनकर, मनीषा वरखडे, संगीता मेश्राम, सत्तेदास आत्राम आदी उपस्थित होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक संस्थेचे सचिव रवींद्र भुरसे, संचालन संस्थेचे सभासद प्रदीप बोडणे यांनी केले. यावेळी उपस्थित सर्व सभासदांना दहा टक्के अनुदान योजनेतून साहित्याचे वाटप करण्यात आले. कोरोना संसर्गाचे सर्व नियम पाळून पन्नास सदस्यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम घेण्यात आला.
250721\4455img_20210725_160048.jpg
संस्थेच्या सभासदांना मार्गदर्शन करताना