रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 6, 2019 12:19 AM2019-07-06T00:19:23+5:302019-07-06T00:19:49+5:30

गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.

The idyllic nature of empty plots | रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप

रिकाम्या भूखंडांना डबक्याचे स्वरूप

Next
ठळक मुद्देनगर पालिकेचे नियंत्रणच नाही : स्वच्छता अभियान व सांडपाणी व्यवस्थापनाचा फज्जा

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : गेल्या १० ते १२ वर्षांपासून गडचिरोली नगर पालिकेच्या हद्दीतील अनेक वॉर्डात रिकामे भूखंड तसेच कायम आहेत. सदर भूखंडाकडे दुर्लक्ष होत असल्याने या भूखंडात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले असून या भूखंडांना आता पावसाळ्यात डबक्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
शहरातील कन्नमवार वॉर्ड, विवेकानंनगर, गोकुलनगर, स्नेहनगर, रामनगर, सर्वोदय वॉर्ड आदीसह बहुतांश वॉर्डात कृषक, अकृषक, येलो बेल्ट, अतिक्रमीत आदी सर्व प्रकारचे मिळून जवळपास ४०० पेक्षा अधिक रिकामे भूखंड गेल्या अनेक वर्षांपासून तसेच कायम आहेत. नगर पालिकेकडे केवळ अकृषक प्लाटाची नोंद आहे. मात्र त्यावर टॅक्सही लावण्यात आला नाही.
सदर भूखंड हे खोलगट भागात असल्याने पावसाळ्यात या भूखंडात दरवर्षी पाणी साचते. यावर्षीही अशीच परिस्थिती आहे. गडचिरोली शहरात गेल्या आठवडाभरापासून पाऊस सुरू असल्याने रिकाम्या भूखंडात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्याचा लगतच्या घरांना व कुटुंबांना त्रास होत आहे.
पावसाळा वगळता इतर ऋतुमध्ये मोकड्या भूखंडावर लगतचे नागरिक घरातील कचरा बिनधास्तपणे टाकतात. आता पावसाचे पाणी रिकाम्या भूखंडावर साचले असल्याने कचरा तरंगत असल्याचे दिसून येत आहे. रिकाम्या भूखंडाची जागा खोलगट असल्याने येथून दुसरीकडे पाण्याची निचरा होत नाही. बहुतांश भूखंड मालक गडचिरोली शहरात राहत नसल्याने नगर पालिकेला सदर प्लॉटमधील पाण्याचा निचरा करण्यासाठी तात्पुरत्या स्वरूपाची नालीही खोदता येत नाही. त्यामुळे रिकाम्या भूखंडापासून सांडपाण्याची तयार झालेल्या या समस्येला मार्गी लावण्यासाठी पालिकेसमोरही पर्याय नसल्याचे दिसून येत आहे.
रिकाम्या भूखंडात पाणी साचून डबक्या स्वरूप प्राप्त झाल्याने डासांची उत्पत्ती मोठ्या प्रमाणात वाढली आहे. परिणामी पावसाळ्यात विविध आजाराची साथ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावण्यासाठी नगर पालिका प्रशासनाने ठोस उपाययोजना करण्याची गरज आहे.

रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करा; सतीश विधाते यांची मागणी
शहरातील विवेकानंदनगर, कन्नमवारनगरसह बऱ्याच वॉर्डात शेकडोच्या संख्येने रिकामे-मोकळे भूखंड आहेत. सदर भूखंडाची देखभाल करण्याकडे संबंधित मालकांचे दुर्लक्ष होत आहे. परिणामी सदर रिकाम्या भूखंडात आता पावसाचे पाणी साचले आहे. भूखंडात साचलेल्या पाण्याचा त्रास सभोवतालच्या घरांना होत आहे. यासंदर्भातील तक्रारी माझ्याकडे प्राप्त झाल्या. त्याअनुषंगाने आपण प्रत्यक्ष वॉर्डात जाऊन पाहणी केली. मात्र रिकाम्या भूखंडावर कच्च्या स्वरूपाची नाली मारून पाण्याची विल्हेवाटही करणे शक्य नाही. याचे कारण रिकामे भूखंड नेमक्या कुणाच्या मालकीचे आहे हे लगतच्या कुटुंबांनाही माहित नाही. एकूणच सदर विषय गंभीर आहे. रिकाम्या भूखंडाची ही समस्या मार्गी लावून पावसाचे व बाथरूमच्या सांडपाण्याचा योग्यरित्या निचरा होण्यासाठी कार्यवाही व्हावी, त्यासाठी पालिका प्रशासनाने शहरातील सर्व रिकाम्या भूखंड मालकांवर कराची आकारणी करावी, अशी मागणी नगरसेवक सतीश विधाते यांनी केली आहे.

सरपटणाऱ्या प्राण्यांचा धोका
शहराच्या स्नेहनगरातील स्टेडियम परिसरात अनेक रिकामे भूखंड आहेत. काही भूखंडात मोठमोठी झाडे असून घाणीचे साम्राज्य आहे. वाढलेली झाडे, झुडूपे व वाचलेच्या पाण्यामुळे साप, विंचू आदी सरपटणाऱ्या प्राण्यांपासून लगतच्या नागरिकांना धोका होण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाढलेली मोठमोठी झाडे, झुडूपे तोडून स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.

Web Title: The idyllic nature of empty plots

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस