खोटी माहिती दिली तर लग्न ठरणार बेकायदेशीर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 14, 2024 05:09 PM2024-10-14T17:09:19+5:302024-10-14T17:10:53+5:30
प्रमाणपत्रासाठी नियम कडक : ग्रामपंचायतमध्ये सुविधा
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : बनावट विवाह करून विविध योजनांचा फायदा उचलणे किंवा एखाद्या संस्थेची फसवणुक केल्याचे प्रकार राज्यात घडत असल्याने आता विवाह नोंदणी अतिशय कडक करण्यात आली आहे. खोटी माहिती सादर केली असल्याचे लक्षात आल्यास विवाह रद्द केला जातो.
लग्न झाल्याचा पुरावा म्हणून विवाह नोंदणी प्रमाणपत्र आवश्यक करण्यात आले आहे. ग्रामपंचायत, नगर परिदेकडे विवाह नोंदणीसाठी अर्ज करता येते. किंवा निबंधक कार्यालयातही विवाहाची नोंद करता येते. विवाहापूर्वीची मुलीच्या शिक्षणाची कागदपत्रे वडिलाच्या नावाची असतात. लग्नानंतर पतीचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे नावात बदल होतो. आधार कार्ड, निवडणूक कार्ड बदलवावे लागतात. त्यावर पत्ता बदल्यासाठी लग्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
कोण देतो प्रमाणपत्र?
ग्रामीण भागात ग्रामसेवक व शहरात मुख्याधिकारी यांना लग्न प्रमाणपत्र देण्याचे अधिकार देण्यात आले आहेत. तसेच निबंधक कार्यलय सुद्धा विवाहाचे प्रमाणपत्र देते. त्यासाठी आवश्यक कागदपत्रे सादर करावी लागतात.
या कारणांनी होते लग्न रद्द
लग्न प्रमाणपत्राशी संबंधित माहिती ऑनलाइन सादर करावी लागते. यात आवश्यक असलेली प्रमाणपत्रे जोडावी लागतात. मात्र ती जोडली नसल्यास ल्न प्रमापत्राची विनंती रद्द केली जाते. त्यात आवश्यक सुधारणा सुचवल्या जातात.
लग्न प्रमाणपत्राची गरज काय?
विवाहापूर्वीची मुलीच्या शिक्षणाची कागदपत्रे वडिलाच्या नावाची असतात. लग्नानंतर पतीचे नाव पुढे केले जाते. त्यामुळे नावात बदल होतो. आधार कार्ड, निवडणूक कार्ड बदलवावे लागतात. त्यावर पत्ता बदल्यासाठी लग्न प्रमाणपत्र आवश्यक आहे.
ऑनालाइन सुविधा
लग्न प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आता ग्रामपंचायत किंवा नगर परिषदेत जाण्याची गरज नाही. आपले सरकार पोर्टलवर याची ऑनलाइन नोंद करता येते. सर्व कागदपत्रे अपलोड केल्यानंतर लग्न प्रमाणपत्र जारी केले जाते.