जीएनएम बंद झाल्यास आरोग्य व्यवस्था विस्कळीत होईल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 29, 2019 10:44 PM2019-04-29T22:44:44+5:302019-04-29T22:45:04+5:30

दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षीत नर्सेस करीत आहेत. मात्र इंडियन नर्सिंग कौन्सील व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने जीएनएम अभ्यासक्रम बंद करण्याचे नोटीफिकेशन काढले आहे.

If GNM closures, the health system will be disrupted | जीएनएम बंद झाल्यास आरोग्य व्यवस्था विस्कळीत होईल

जीएनएम बंद झाल्यास आरोग्य व्यवस्था विस्कळीत होईल

googlenewsNext
ठळक मुद्देअभ्यासक्रम सुरू ठेवावा : डॉ. प्रमोद साळवे यांची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : दुर्गम व ग्रामीण भागात सेवा देण्याचे महत्त्वपूर्ण काम जीएनएम (जनरल नर्सिंग मिडवायफरी) प्रशिक्षीत नर्सेस करीत आहेत. मात्र इंडियन नर्सिंग कौन्सील व केंद्रीय आरोग्य कुटुंब कल्याण विभागाने जीएनएम अभ्यासक्रम बंद करण्याचे नोटीफिकेशन काढले आहे. हा अभ्यासक्रम बंद झाल्यास ग्रामीण व दुर्गम भागात सेवा देणाऱ्या नर्सेस मिळणे कठीण होऊन आरोग्य सेवा विस्कळीत होईल, अशी शक्यता आयुर्वेद उत्कर्ष मंडळ विदर्भ प्रदेश नागपूरचे अध्यक्ष डॉ. प्रमोद साळवे यांनी व्यक्त केली आहे.
जीएनएम हा अभ्यासक्रम बंद करून त्याचे रूपांतर बीएससी नर्सिंगमध्ये केले जाणार आहे. हा उद्देश चांगला आहे. मात्र वस्तूस्थितीला धरून नाही. कारण प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रूग्णालय, जिल्हा सामान्य रूग्णालय व इतर खासगी रूग्णालयांमध्ये ९५ टक्के नर्सेस जीएनएम अभ्यासक्रम केलेल्या आढळतात. गोरगरीब पाकलाच्या मुली जीएनएम करून नोकरी प्राप्त करतात. जीएनएमला सहज अ‍ॅडमिशन मिळते. निकालही चांगला लागतो. मराठी, हिंदी, इंग्रजी भाषा असल्याने दुर्गम भागातील मुलींना अभ्यासाची अडचण जात नाही. मात्र बीएससी नर्सिंग अभ्यासक्रम फक्त इंग्रजी माध्यमामध्ये राहतो. ग्रामीण भागातील मुली या अभ्यासक्रमाला शिकणार नाही. जीएनएमला कोणत्याही शाखेची विद्यार्थिनी प्रवेश घेऊ शकते. मात्र बीएससी नर्सिंगला विज्ञान आवश्यक आहे. बीएससी नर्सिंग केलेल्या विद्यार्थिनी ग्रामीण भागात जाऊन सेवा देणार काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. त्यामुळे जीएनएम अभ्यासक्रम बंद करू नये, अशी मागणी डॉ. प्रमोद साळवे यांनी केली आहे.
पीएचसीला नर्सेस मिळणे होईल कठीण
बीएससी नर्सिंग झालेल्या विद्यार्थिनी ग्रामीण व दुर्गम भागात काम करण्यास सहजासहजी तयार होत नाही. ग्रामीण भागात आजही जीएनएमचे प्रशिक्षण घेतलेल्या नर्सेस आहेत. हा अभ्यासक्रम बंद केल्यास ग्रामीण व दुर्गम भागातील रूग्णालयांमध्ये सेवा देण्यासाठी नर्सेस मिळणे कठीण होईल.

Web Title: If GNM closures, the health system will be disrupted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.