दाेन दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आंदाेलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2021 04:27 AM2021-06-01T04:27:39+5:302021-06-01T04:27:39+5:30

आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत उन्हाळी धान खरेदी करण्याबाबत जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीवरून संवाद ...

If the grain procurement center is not started within two days | दाेन दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आंदाेलन

दाेन दिवसांत धान खरेदी केंद्र सुरू न केल्यास आंदाेलन

Next

आधारभूत खरेदी केंद्रांतर्गत उन्हाळी धान खरेदी करण्याबाबत जि.प. अध्यक्ष कंकडालवार यांनी आदिवासी विकास महामंडळाच्या उपप्रादेशिक व्यवस्थापकांशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. यावेळी जि.प. अध्यक्षांनी धान उत्पादक शेतकऱ्यांची समस्या सविस्तर मांडली. खरेदी केंद्र सुरू न झाल्याने शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना धानाची विक्री करीत आहेत. यात शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान हाेत आहे, असे सांगितले. उपप्रादेशिक व्यवस्थापकांनी येत्या दोन दिवसांत खरेदी केंद्र सुरू करून धान उत्पादक शेतकऱ्यांचे उन्हाळी हंगामातील धान खरेदी करू, असे आश्वासन दिले.

येत्या दोन दिवसांत रबी हंगामातील धान खरेदी केंद्रांमार्फत खरेदी न केल्यास आविसं नेते माजी आमदार दीपक आत्राम यांच्या मार्गदर्शनात शेतकऱ्यांसह आंदाेलन केले जाईल, असा इशारा जि.प. अध्यक्ष अजय कंकडालवार यांनी दिला आहे.

Web Title: If the grain procurement center is not started within two days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.