ऑपरेटर न नेमल्यास डाटाएंट्रीचे काम बंद करणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:37 AM2021-01-25T04:37:32+5:302021-01-25T04:37:32+5:30
गडचिराेली : ग्रामीण भागात आराेग्य सेवेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आराेग्य सेविकांकडे डाटाएंट्रीचे काम साेपविण्यात आले आहे. आधीच विविध ...
गडचिराेली : ग्रामीण भागात आराेग्य सेवेच्या विविध जबाबदाऱ्या पार पाडणाऱ्या आराेग्य सेविकांकडे डाटाएंट्रीचे काम साेपविण्यात आले आहे. आधीच विविध कामांचा ताण असताना पुन्हा नवीन जबाबदारी दिल्याने कर्मचाऱ्यांना त्रास हाेत आहे. त्यामुळे डाटाएंट्रीचे काम करण्याकरिता स्वतंत्र ऑपरेटर नेमावे, अन्यथा डाटाएंट्रीचे काम बंद करण्यात येईल, असा इशारा जि. प. नर्सेस संघटनेने दिला. जिल्हा आराेग्य अधिकारी डाॅ. शशिकांत शंभरकर यांना यासंदर्भात निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, डाटाएंट्रीचे काम करण्यासाठी आराेग्य सेविकांकडे जबाबदारी साेपविण्यात आली; परंतु त्यांना सहा राष्ट्रीय कार्यक्रम, माता बाल संगाेपन, आरसीएच, एचडब्ल्यूसी, आरकेएसके, जेएसएसके, मानव विकास व वेळेवर येणारे इतर कार्यक्रम पाहावे लागतात. ग्रामीण भागात लाभार्थ्यांच्या गृहभेटी घ्याव्या लागतात. आराेग्य सेविकांवर कामाचे ताण असताना नव्याने एनसीडी डाटाएंट्रीचे काम साेपविले आहे. त्यामुळे माता व बालसंगाेपनाकडे दुर्लक्ष हाेत आहे. आराेग्य विभागातील ऑनलाईन व ऑफलाईन डाटाएंट्रीची कामे करण्यासाठी स्वतंत्र डाटाऑपरेटर आवश्यक आहे. तेव्हाच आराेग्य सेविकांना तणावमुक्त आराेग्य सेवा देता येईल. आराेग्य सेविकांच्या कामाचा व्याप बघता डाटाएंट्रीचे काम काढून घ्यावे, अशी मागणी संघटनेच्या अध्यक्ष माया सिरसाट, प्रभारी अध्यक्ष नीलू वानखेडे, उपाध्यक्ष जाेती काबरे, मंगला चंदनखेडे, कार्याध्यक्ष बेबी वड्डे, काेषाध्यक्ष कल्पना रामटेके, वंदना भारती, आशा काेकाेडे, माया भटकर, गाैरी हेडाे, शीतल रायपुरे, पार्वती सांगळे, छब्बू लेकामी, माया मडावी, अर्चना चाैधरी, साेनू मानकर, छाया गजभिये, पुष्पा उईके, चंपा उईके, यशाेदा राठाेड, वंदना कुळमेथे, रेखा काेकाेडे, शाेभा गेडाम यांनी केली.