मनाच्या श्रीमंतीला संघर्षाचा आधार दिल्यास यशप्राप्ती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2018 12:17 AM2018-10-01T00:17:47+5:302018-10-01T00:18:58+5:30
मनाची श्रीमंती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या श्रीमंतीला संघर्षाचा आधार दिल्यास विद्यार्थी हा आपल्या जीवनात हवे ते ध्येय गाठून यशस्वी होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
विसोरा : मनाची श्रीमंती हीच सर्वश्रेष्ठ संपत्ती आहे. या श्रीमंतीला संघर्षाचा आधार दिल्यास विद्यार्थी हा आपल्या जीवनात हवे ते ध्येय गाठून यशस्वी होतो, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे यांनी केले.
विसोरा येथील विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात धनंजय पाटील नाकाडे यांच्या स्मृतीदिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानाहून ते बोलत होते.
विसोराच्या विनायक शिक्षण संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, कवी, लेखक, झाडीपट्टी रंगभूमीचे अभ्यासक तथा बांबू चित्रकलेचे प्रणेते धनंजय पाटील नाकाडे यांचा स्मृतिदिन कार्यक्रम विनायक माध्यमिक तथा उच्च माध्यमिक विद्यालयात घेऊन त्यांना आदरांजली वाहण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विनायक शिक्षण संस्थेचे अध्यक्ष तथा सभापती, कृषी व पशुसंवर्धन सभापती नाना नाकाडे होते. प्रमुख अतिथी म्हणून भैयाजी नाकाडे, सरस्वती नाकाडे, एन. ए. नाकाडे, व्ही. व्ही. बुद्धे, बी. एम. नाकाडे, एन. बी. सहारे, व्ही. व्ही. पेंदाम, निता कापगते, वासनिक उपस्थित होते.
शाळेत धनंजय नाकाडे यांच्या स्मृतिदिनाच्या औचित्याने चित्रकला आणि भावगीत स्पर्धा घेण्यात आल्या. या स्पर्धेत विजेते ठरलेल्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाला विद्यार्थी, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी हजर होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य एम. बी. कापगते, संचालन ए. बी. बुराडे तर आभार एस. आर. बुद्धे यांनी मानले.