वाघांचा बंदाेबस्त न केल्यास काळे फासणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 20, 2021 04:40 AM2021-05-20T04:40:05+5:302021-05-20T04:40:05+5:30
गेल्या तीन वर्षांपासून वडसा वनविभागात वाघांचा वावर असून वाघांनी धुमाकूळ घातला आहे. महिला व पुरुषांचा जीव जात असतानाही वनविभाग ...
गेल्या तीन वर्षांपासून वडसा वनविभागात वाघांचा वावर असून वाघांनी धुमाकूळ घातला आहे. महिला व पुरुषांचा जीव जात असतानाही वनविभाग वाघांचा बंदाेबस्त करण्याकडे दुर्लक्ष करीत आहे. दिभना येथील महिलेवर वाघाने हल्ला करून तिला ठार केल्याची माहिती मिळताच शिवसेनेच्या माजी संघटिका छाया कुंभारे व विधानसभा संघटक नंदू कुमरे यांनी बुधवारी मुख्य वनसंरक्षक डाॅ. किशाेर मानकर यांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन दिले. उपाययाेजना न केल्यास व पुन्हा ज्या भागात घटना घडेल त्या भागातील गावच्या लोकांना घेऊन मोर्चा काढून बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा माजी शिवसेना महिला जिल्हा संघटिका तथा माजी जिल्हा परिषद बांधकाम सभापती छाया कुंभारे, विधानसभा क्षेत्र संघटक नंदू कुमरे, शकुन नंदनवार यांनी दिला.
बाॅक्स
अशी करावी उपाययाेजना
नागरिकांना सतर्क करण्यासाठी वाघांचे वास्तव्य असलेल्या भागातील गावांमध्ये भाेंग्याद्वारे मुनारी द्यावी. कॅमेरे व ड्राेनद्वारे वाघांच्या हालचालीवर देखरेख ठेवावी, वाघाने हल्ला करून जखमी अथवा ठार केल्यास संबंधित वनरक्षक, वनपाल, वनपरिक्षेत्राधिकारी, विभागीय वनाधिकारी यांना जबाबदार धरावे. याेग्य उपाययाेजना न केल्यास किंवा पुन्हा निरपराध लाेकांचा बळी गेल्यास वनविभागाच्या अधिकाऱ्यांना काळे फासण्यात येईल, असा इशारा पदाधिकाऱ्यांनी दिला.
===Photopath===
190521\19gad_5_19052021_30.jpg
===Caption===
सीसीएफ डाॅ. किशाेर मानकर यांना निवेदन देताना छाया कुंभारे, नंदनवार.