विदर्भ न दिल्यास धडा शिकवू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 8, 2018 01:06 AM2018-02-08T01:06:48+5:302018-02-08T01:07:15+5:30

केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देणार असे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु सरकार आल्यानंतर चार वर्षांचा कालावधी उलटत असतानाही भाजप सरकार आता मात्र, विदर्भ राज्याचा मुद्यावर मौन पाळून आहे.

 If we do not have any Vidarbha then we will teach the lesson | विदर्भ न दिल्यास धडा शिकवू

विदर्भ न दिल्यास धडा शिकवू

Next
ठळक मुद्दे मुलचेरा येथे सभा : विदर्भ राज्य आंदोलन समितीचा सरकारला इशारा

ऑनलाईन लोकमत
मुलचेरा : केंद्रात आणि राज्यात भाजपची सत्ता आल्यास स्वतंत्र विदर्भ राज्य देणार असे आश्वासन भाजपने दिले होते. परंतु सरकार आल्यानंतर चार वर्षांचा कालावधी उलटत असतानाही भाजप सरकार आता मात्र, विदर्भ राज्याचा मुद्यावर मौन पाळून आहे. त्यामुळे २०१९ पर्यंत स्वतंत्र विदर्भ राज्याची घोषणा करावी अन्यथा जनताच धडा शिकवणार, असा इशारा विदर्भ राज्य आंदोलन समितीचे मुख्य निमंत्रक राम नेवले यांनी मुलचेरा येथील स्वतंत्र विदर्भ राज्य समितीच्या बैठकीत दिला.
तीन वर्षे लोटूनही अजूनपर्यंत काहीही निर्णय न घेतल्याने विदर्भातील शेतकरी आणि बेरोजगार यांची परिस्थिती जैसे थे आहे. त्यामुळे स्वतंत्र विदर्भ राज्यशिवाय पर्याय नाही. म्हणून यापुढे समितीच्या वतीने आंदोलन तीव्र करण्यात येणार असून १ मार्चला शासनाच्या निषेधार्थ बेरोजगारांचे डिग्री जलाओ आंदोलन, तर १६ आणि १७ एप्रिलला विदर्भ राज्य आंदोलन समितीचे दुसरे राष्ट्रीय अधिवेशन होणार आहे. त्यात विदर्भ आर्थिकदृष्ट्या कसे सक्षम राज्य राहील हे पटवून दिले जाणार आहे. त्यानंतर १ मे रोजी नागपूर विधानभवनावर विदर्र्भाचा झेंडा फडकवणार असल्याचे त्यांनी सांगितले. महाराष्ट्रावर कर्जाचे डोंगर वाढतच चालला मात्र,याचे फरतफेड करण्यासाठी महाराष्ट्राला फक्त विदर्भ एक पर्याय असल्याने येथील मौल्यवान साधनसंपत्ती पळवून नेण्याचा कट चालला आहे, असा आरोप त्यंनी केला.
मुलचेरा तालुक्यात समिती गठित होणार आहे. त्यासाठी तालुका अध्यक्ष म्हणून बादल महादेव शहा यांची निवड करण्यात आली. यावेळी पश्चिम विदर्भाच्या महिला आघाडी अध्यक्ष रंजना मामर्डे, जिल्हा समन्वयक अरुण मुनघाटे, चामोर्शी तालुका अध्यक्ष अशोक पोरेड्डीवार, विठ्ठलराव निखुले व कार्यकर्ते हजर होते.

Web Title:  If we do not have any Vidarbha then we will teach the lesson

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.