संकल्प केल्यास विकल्प प्राप्त हाेतील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 14, 2021 04:34 AM2021-02-14T04:34:39+5:302021-02-14T04:34:39+5:30
लाेकमत न्यूज नेटवर्क गडचिराेली : काेणतीही गाेष्ट प्राप्त करण्यासाठी संकल्प करावा लागताे. संकल्प पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या तरी ...
लाेकमत न्यूज नेटवर्क
गडचिराेली : काेणतीही गाेष्ट प्राप्त करण्यासाठी संकल्प करावा लागताे. संकल्प पूर्ण करताना अनेक अडचणी आल्या तरी त्यातून विकल्प आपाेआप प्राप्त हाेते. आळस हा माणसाचा सर्वात माेठा शत्रू आहे. आळशी व्यक्तीला विद्या प्राप्त हाेत नाही. विद्येशिवाय धन मिळत नाही. धन नसल्यास मित्र मिळत नाही व सारे सुख माणसापासून परत जातात, असे प्रतिपादन नारायणा एज्युकेशनल साेसायटीचे अध्यक्ष शंकरप्रसाद अग्नीहाेत्री यांनी केले.
स्थानिक स्कूल ऑफ स्काॅलर्स शाळेत शनिवारी ‘पाल्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासात पालकांची भूमिका’ या विषयावर मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयाेजन करण्यात आले. तसेच शाळेतील प्री-प्रायमरी वर्गांची पुनर्रचना करण्यात आली आहे. याचे उद्घाटन शंकरप्रसाद अग्निहाेत्री यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत हाेते. कार्यक्रमाला एसओएसचे सहसचिव अविनाश सेलूकर, अकॅडमिक डायरेक्टर विनाेदकुमार पिल्लई, प्राचार्य गणेश पारधी, अभिजित वंजारी आदी मान्यवर उपस्थित हाेते.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये परिश्रम करण्याची ताकद आहे. त्यांना फक्त मार्गदर्शनाची गरज आहे. याेग्य असे मार्गदर्शन स्कूल ऑफ स्काॅलर्सच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना मिळेल. येथील विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण देण्याचा प्रयत्न संस्थेकडून केला जाईल. या शाळेतील जाे विद्यार्थी पुढे जाऊन आयएएस किंवा आयपीएस बनेल, त्याला एक लाख रुपयाचे बक्षीस संस्थेकडून दिले जाईल, असे आश्वाासन अग्निहाेत्री यांनी दिले.