पीएमचे पैसे हवे, तर लवकर करा मोबाइल नंबर अपडेट

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2024 01:40 PM2024-09-12T13:40:48+5:302024-09-12T13:41:24+5:30

दुरुस्तीसाठी मुदतवाढ : चुकीच्या डाटामुळे अडचणी

If you want PM money, update your mobile number soon | पीएमचे पैसे हवे, तर लवकर करा मोबाइल नंबर अपडेट

If you want PM money, update your mobile number soon

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
प्रधानमंत्री किसान सन्मान योजनेंतर्गत लाभ घेणाऱ्या अनेक शेतकऱ्यांचा डाटा अपलोड करताना शेतकऱ्यांनी नोंदणीच्या वेळी दिलेले मोबाइल क्रमांक चुकीचे असल्याचे आढळून आलेले आहेत. सदर मोबाइल क्रमांक दुरुस्तीची संधी राज्य शासनाने दिली होती. ३१ ऑगस्टपर्यंत ही मुदत होती. आता यासाठी मुदतवाढ देण्यात आलेली आहे. त्यामुळे योजनेचे पैसे लटकण्यापूर्वी शेतकऱ्यांनी आपला मोबाइल क्रमांक बदलून घेणे फायद्याचे ठरणार आहे.


पीएम किसान योजनेसाठी पोर्टलवर माहिती अपलोड करताना चुकीच्या भ्रमणध्वनी क्रमांकाची नोंदणी करण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे. ते दुरुस्त करून घेण्यासाठी राज्य शासनाने मुदतवाढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी मुदतीत भ्रमणध्वनी क्रमांक दुरुस्त करून घेणे आवश्यक आहे. तेव्हाच यापुढील पीएम किसान सन्मान निधीचा लाभ शेतकऱ्यांना मिळू शकतो, अन्यथा लाभापासून वंचित राहण्याची वेळ येऊ शकते. 


ईकेवायसी बाकी 
जिल्ह्यात दीड लाखांवर शेतकरी पीएम किसान सन्मान निधीच्या लाभासाठी पात्र आहेत. यापैकी चार हजारांच्या आसपास शेतकऱ्यांची ई-केवायसी झालेली नाही. हे शेतकरी निधीच्या लाभापासून वंचित आहेत.


मोबाइल नंबर दुरुस्तीसाठी मुदत 
मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी शासनाने सुरुवातीला ३१ ऑगस्टपर्यंत मुदत दिली होती. आता मुदतवाढ दिली असून १५ सप्टेंबरपर्यंत शेतकऱ्यांना दुरुस्ती करता येणार आहे.


आधारशी संलग्न मोबाइल क्रमांक हवा 
पीएम किसान योजनेसाठी नोंदणी करताना लाभार्थ्यांनी त्यांचा आधार संलग्न भ्रमणध्वनी क्रमांक नोंदणी करणे आवश्यक आहे. या नोंदणीवेळी लाभार्थ्यांचा एक भ्रमणध्वनी क्रमांक अनेक नोंदणीसाठी वापरण्यात आल्याचे ऑनलाइन पोर्टलवर दिसत आहे.


मोबाइल दुरुस्तीबाबत जागृती करण्याची गरज 
कृषी विभागामार्फत शेतकऱ्यांमध्ये मोबाइल क्रमांक दुरुस्तीसाठी जागृती केली जात आहे; परंतु याबाबत बहुतांश शेतकऱ्यांना माहिती नसल्याने ते शेतकरी अजूनही मोबाइल क्रमांक बदलायचे आहेत.


असा करावा मोबाइल क्रमांक अपडेट 
शेतकऱ्यांनी pmkisan.gov.in या वेबसाईटवर क्लिक करावे. त्यात उजव्या बाजूला फार्मर कॉर्नरमध्ये अपडेट मोबाइल नंबरवर क्लिक करावे. अपडेट मोबाइल नंबर ही विंडो ओपन झाल्यानंतर त्यामध्ये आपला रजिस्ट्रेशन नंबर किंवा आधार क्रमांक टाकल्यानंतर नंबर अपडेट होईल.

Web Title: If you want PM money, update your mobile number soon

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.