मोफत तीन गॅस सिलिंडर हवे, ई-केवायसी केली का?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2024 02:54 PM2024-08-23T14:54:10+5:302024-08-23T14:55:23+5:30

मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना : एजन्सीत करावी लागेल नोंदणी, लाभ घेण्याचे आवाहन

If you Want three free gas cylinders, have you done e-KYC? | मोफत तीन गॅस सिलिंडर हवे, ई-केवायसी केली का?

If you Want three free gas cylinders, have you done e-KYC?

लोकमत न्यूज नेटवर्क 
गडचिरोली :
राज्य शासनाच्या 'मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजने' अंतर्गत पात्र लाभार्थी कुटुंबांना वार्षिक तीन गॅस सिलिंडरचे पुनर्भरण मोफत करून देण्यात येणार आहे. यासाठी प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या व 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेचे लाभार्थी कुटुंब पात्र ठरणार असल्याने संबंधित लाभार्थ्यांनी गॅस एजन्सीमध्ये संपर्क करावा; तसेच ई-केवायसी करणे गरजेचे आहे. ई-केवायसी गॅस डिस्ट्रिब्युटर शोरूममध्येही करता येईल. 


एच.पी. पे. अॅपवरून सेल्फ ई- केवायसी करता येते. ई-केवायसी ही एक साधी एक मिनिटाची प्रक्रिया आहे ज्यासाठी फिंगरप्रिंट किंवा फेशिअल व्हेरिफिकेशनद्वारे ग्राहकाचे बायोमेट्रिक प्रमाणीकरण आवश्यक आहे. ग्राहकांनी गॅससाठी ऑनलाइन बुकिंग करावे; तसेच तीन सिलिंडरची रक्कम लाभार्थ्यांकडून गॅस एजन्सीमार्फत वसूल करण्यात येईल. त्याकरिता ग्राहकांनी गॅस एजन्सीकडून सिलिंडर खरेदी केल्यानंतर तीन सिलिंडरची रक्कम ग्राहकांच्या बँक खात्यामध्ये अनुदानाच्या रूपात जमा होईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी महिलांच्या नावावर गॅस कनेक्शन असणे आवश्यक आहे. कुटुंबप्रमुख अर्थात पुरुषाच्या नावावर कनेक्शन असेल तर ते ग्राह्य धरले जाणार नाही. त्यासाठी महिलेच्या नावावर कनेक्शन करावे लागणार आहे.


२३ गॅस परवानाधारक गडचिरोली जिल्ह्यात आहेत. यात भारत पेट्रोलियम (बीपीसीएल) ६, इंडियन ऑइल (आय.ओ.सी.एल.) २, हिंदुस्थान पेट्रोलियम (एच.पी.सी.एल.) १५ गॅस एजन्सी कार्यरत आहेत. लाभार्थ्यांना काही अडचण असल्यास जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयात संपर्क साधावा, असे जिल्हा पुरवठा अधिकारी प्रकाश आघाव पाटील यांनी कळविले आहे. 

Web Title: If you Want three free gas cylinders, have you done e-KYC?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.