बंधारा दुरूस्तीकडे दुर्लक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 31, 2018 12:36 AM2018-03-31T00:36:10+5:302018-03-31T00:36:10+5:30
झिंगानूरपासून एक किमी अंतरावर वन विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले. मात्र सदर बंधारा फुटला असून दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
ऑनलाईन लोकमत
झिंगानूर : झिंगानूरपासून एक किमी अंतरावर वन विभागाने बंधाऱ्याचे बांधकाम केले. मात्र सदर बंधारा फुटला असून दुरूस्तीकडे वनविभागाचे दुर्लक्ष झाले आहे.
झिंगानूर-सिरोंचा मार्गावर वनविभागाने लाखो रूपये खर्चुन बंधारा बांधला. जवळपासच्या शेतीला पाण्याची सुविधा उपलब्ध होईल व वन्यजीवांसाठीही पाणी राहील, या उद्देशाने बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले. मात्र अल्प कालावधीतच बंधारा फुटला आहे. जवळपासच्या फरशा पूर्णपणे निघून गेले आहेत. त्यामुळे याठिकाणी पावसाळ्यातही पाणी साचून राहत नाही. झिंगानूर-सिरकोंडा मार्गापासून १०० मीटर अंतरावर या बंधाºयाचे बांधकाम करण्यात आले आहे. निकृष्ट दर्जाचे बांधकाम झाल्याने सदर बंधारा अल्पावधीतच पूर्णपणे फुटला.
वनविभागाच्या अधिकाºयांनी सदर बंधारा बांधण्यासाठी निधी मंजूर करावा, अशी मागणी होत आहे. वन्यजीवांना पाण्याची सुविधा उपलब्ध व्हावी, यासाठी झिंगानूर परिसरात अनेक बंधारे बांधले आहेत. जंगलातील बंधाºयाची चौकशी होत नाही. त्यामुळे कंत्राटदार वनविभागाच्या अधिकाºयाच्या संगणमताने अत्यंत निकृष्ट दर्जाचे बांधकाम करतात. परिणामी अल्पावधीतच बंधारे फुटतात.