कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 11, 2017 11:08 PM2017-11-11T23:08:36+5:302017-11-11T23:08:50+5:30

महागाईने जनता त्रस्त असून बेरोजगार तरूण, तरूणी नोकरीच्या शोधात आहे. त्यातल्या त्यात अत्यल्प मानधनावर काम करीत असलेल्या अंगणवाडी महिलांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र सरकार हेतुपुरस्सर....

Ignore labor issues | कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

कामगारांच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष

Next
ठळक मुद्देअंगणवाडी महिलांचा मेळावा : रमेशचंद्र दहिवडे यांची केंद्र सरकारवर टीका

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : महागाईने जनता त्रस्त असून बेरोजगार तरूण, तरूणी नोकरीच्या शोधात आहे. त्यातल्या त्यात अत्यल्प मानधनावर काम करीत असलेल्या अंगणवाडी महिलांच्या विविध प्रश्नांकडे केंद्र सरकार हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे, अशी टीका अंगणवाडी कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे यांनी केली.
अंगणवाडी महिला कर्मचाºयांचा मेळावा ममता धकाते यांच्या अध्यक्षतेखाली गडचिरोली सोमवारी पार पडला. यावेळी प्रमुख अतिथी म्हणून दहिवडे बोलत होते.
मेळाव्याचे प्रास्ताविक भारती रामटेके यांनी केले. यावेळी हेमा खोब्रागडे, अरूणा नांदनकर, सरीता कामडी, संगीता येमनूरवार, वेणू खोब्रागडे, अर्चना खेवले आदी उपस्थित होते. अंगणवाडी महिलांचा संप दडपण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने प्रयत्न केले. आशा वर्कर, शालेय पोषण आहार कर्मचारी, ग्रामरोजगार सेवक यांच्यावर सरकारकडून अन्याय होत आहे, असेही दहिवडे यावेळी म्हणाले. यावेळी बहुसंख्य महिला कर्मचारी हजर होते.

Web Title: Ignore labor issues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.