रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष

By admin | Published: April 22, 2017 01:31 AM2017-04-22T01:31:16+5:302017-04-22T01:31:16+5:30

नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही.

Ignore road repair | रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष

रस्ते दुरूस्तीकडे दुर्लक्ष

Next

१० वर्षांपासून दुरूस्तीच नाही : एटापल्ली तालुक्यात विदारक चित्र
एटापल्ली : नक्षलग्रस्त व ग्रामीण भागातील रस्त्यांची मागील १० वर्षांपासून दुरूस्तीच करण्यात आली नाही. त्यामुळे या तालुक्यातील बहुतांश मार्गाची दुरवस्था झाली आहे. काही मार्गांवर डांबराचे केवळ अवशेष शिल्लक राहिले आहेत.
एटापल्ली तालुक्यातील एटापल्ली-जारावंडी, एटापल्ली-गट्टा, एटापल्ली-बोल्लेपल्ली, एटापल्ली-बुर्गी हे प्रमुख मार्ग आहेत. १० वर्षांपूर्वी बांधकाम विभाग तसेच बीआरओच्या मार्फतीने रस्त्यांची निर्मिती करण्यात आली. निर्मितीनंतर मात्र या मार्गांच्या देखभाल व दुरूस्तीकडे बांधकाम विभागाने कायमचे दुर्लक्ष केले. नक्षल्यांच्या दहशतीमुळे कंत्राटदार मिळत नाही. हे एकमेव कारण पुढे केले जाते. बऱ्याचशा भागात सहजपणे कंत्राटदार उपलब्ध होऊन रस्त्याचे काम होऊ शकते. मात्र याकडेही दुर्लक्ष आहे. आर. आर. पाटील पालकमंत्री असताना अनेक शासकीय इमारतींचे काम येथे सुरू करण्यात आले होते. बऱ्याचशा कामाला निधी मिळाला नसल्याने ते कामही बंद पडून आहे. (प्रतिनिधी)

Web Title: Ignore road repair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.