राजोली नदी पात्रातून ३७१ ब्रास रेतीची अवैध उचल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:07 AM2021-03-13T05:07:12+5:302021-03-13T05:07:12+5:30
धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५ ...
धानोरा तालुक्यातील मिचगाव येथील शेतकरी लालाजी विठाेबा कुदेशी यांची शेती राजाेली नदीपात्रालगत आहे. पुरामुळे शेतात वाहून आलेल्या ०.६५ हेक्टर आर जागेतील रेती उत्खनन करण्याची त्यांनी रीतसर परवानगी घेतली. त्यानुसार त्यांना दिनांक २४ फेब्रुवारी ते २० मार्च या कालावधीत ४७८ ब्रास रेती उत्खनन करण्याची परवानगी देण्यात आली. त्यानुसार उत्खननास सुरुवात करण्यात येऊन शेतातील रेती डम्पिंग करून विविध वाहनाद्वारे विक्री करण्यात येत आहे. दररोज ट्रक, ट्रॅक्टरद्वारे रेतीची वाहतूक सुरू आहे. त्यामध्ये मंजूर रॉयल्टीपेक्षा अधिकचे खनन झाल्याच्या कारणावरून मंडळ अधिकाऱ्यांनी माेका चौकशी करून मोजमाप केले असता ३७१ ब्रास रेती अवैधपणे उत्खनन केल्याचे आढळून आले. तेथे असलेली जेसीबी व एक ट्रॅक्टर जप्त करण्यात आले आहे. असे असले तरी उत्खननाचे काम सुरूच ठेवण्यात आले आहे. उत्खनन स्थळावर जाऊन पाहिले असता रॉयल्टीपेक्षा अधिक उत्खनन झाल्याचे दिसून येते सदर प्रकरणात काय कारवाई केली जाते. याकडे संपूर्ण तालुकावासीयांचे लक्ष लागले आहे. याबाबत तहसीलदार सी. जी. पित्तुलवार यांना विचारले असता शेतमालकाला नोटीस देण्यात आली असून, पंधरा तारखेला तहसील कार्यालयात बोलावण्यात आले आहे. नियमानुसार कारवाई केली जाईल, असे सांगितले.