उसेगाव गाढवी नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:32 AM2021-04-03T04:32:58+5:302021-04-03T04:32:58+5:30

दरवर्षी देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव ...

Illegal extraction of sand from Usegaon donkey river basin | उसेगाव गाढवी नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा

उसेगाव गाढवी नदीपात्रातून रेतीचा अवैध उपसा

googlenewsNext

दरवर्षी देसाईगंज तालुक्यातील नदीघाटांचे लिलाव होऊन करोडो रुपयांचा महसूल शासनास एकट्या देसाईगंज तालुक्यातून मिळत असतो. सद्यस्थितीत नदी घाटांचे लिलाव झाले नसल्याने रेती चोरीचे प्रमाण वाढून ट्रॅक्टरने व इतर साधनांचा वापर करून विनापरवाना वाहतूक करून रेती चोर मालामाल होत आहेत. उसेगाव कमी वस्तीचे गाव असून काही अंतरावर गावानजीकच गाढवी नदी आहे. गावानजीक गाढवी नदीपात्र असल्याने नेमका याच संधीचा फायदा घेत काही ट्रॅक्टरधारक व इतर नदीपात्रातून अवैध रेतीचा उपसा करून रेती विक्री करीत असल्याचे आढळून येत आहेत. रेतीच्या उपशामुळे नदी पात्र खोलगट स्तरापर्यंत पोहोचले आहे. रेतीचा अवैधरित्या उपसा करण्यासाठी रात्री १२ नंतरचा कालावधी रेती चोरांसाठी फलदायी असल्याचे कळते. लाखो रुपयांचा दंड आकारूनही दंडाला न जुमानता रेती चाेरी सुरू आहे. शासन स्तरावरून रेती चोरीचे प्रकरण होऊ नये यासाठी आणखी काही बदल करून रेती तस्करीला कसा आळा घालण्यासाठी उपाययोजना करण्यात यावी, अशी मागणी हाेत आहे.

Web Title: Illegal extraction of sand from Usegaon donkey river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.