मुद्देमालासह तब्बल 17 लाखांची पकडली अवैध दारू
By admin | Published: May 2, 2017 06:32 PM2017-05-02T18:32:50+5:302017-05-02T18:32:50+5:30
अवैध दारू पकडल्याने दिवसाढवळ्या अवैद्य दारूची करणा-या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
ऑनलाइन लोकमत
गडचिरोली, दि. 2 - सडक अर्जुनी तालुक्यातील शेंडा येथून देसाईगंज मार्गे अवैध दारू देसाईगंज वनविभागाच्या नाक्याजवळ एकलपूर गौरनगर जोडमार्गापासून सिनेस्टाईल पाठलाग करून मोठ्या शिताफीने दोन चारचाकी वाहनासह तब्बल सतरा लाखांचा मुद्दे मालासह अवैध दारू पकडल्याने दिवसाढवळ्या अवैद्य दारूची करणा-या आरोपींच्या मुसक्या आवळल्याने अवैद्य व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
देसाईगंज पोलिसांनी पकडलेल्या मुद्देमालासह दारू वाहतूक करणारी बोलेरो पीक अप क्रमांक एमपी एच ३३ जी २२५८ मध्ये दोन आरोपी तर दुसरी गाडी टवेरा क्रमांक एमएच ३४ एए ०२३५ गाडी असून, यात दोन आरोपी होते. देसाईगंज पोलिसांनी चारही आरोपी ताब्यात घेतले असून, अटक करण्यात आलेले चारही आरोपी वेगवेगळ्या ठिकाणचे आहेत. विनोद आनंदराव राऊत २४ वर्ष मालडोंगरी ता. ब्रम्हपूरी, जि. चंद्रपूर हा पीक अप चालक, संघपाल रामचंद्र पिलारे २६ वर्ष रा. मळेघाट, ता. लाखांदूर जि. भंडारा, हा टवेरा चालक असून, मकसूद नशिर बेग ३५ वर्ष रा. ब्रम्हपुरी गुजरीवार्ड, ता. ब्रम्हपुरी जि. चंद्रपूर, रंगदेव दिनबाजी वंजारी ५० वर्ष रा. साकोली जि. भंडारा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे. रंगदेव वंजारी हा आरोग्य विभागाचा शासकीय कर्मचारी असल्याचे सांगण्यात येत आहे.
देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारावर आज २ मे रोजी सकाळी ११.३० च्या दरम्यान गौरनगर एकलपूर जोडमार्गाजवळ पोलीस ताफ्यासह पाळत ठेवली होती, याच दरम्यान अर्जुनी मार्गावरून एक टवेरा व दुसरी बोलेरो येत असल्याची दिसले. हात देऊनही दोन्ही गाड्या न थांबल्याने संशय आणखीनच बळावला असून, या दोन्ही गाड्यांचा सिनेस्टाईल पाठलाग करून वडसा वनविभागाच्या नाक्याजवळ दोन्ही गाड्यांना अडविण्यात यशस्वी झाले. सदर कारवाई पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अशोक मिर्झा, रामभाऊ मेश्राम, अरुण जुवारे, जितू भोयर, सिताराम लांजेवार, श्रीराम खरकाटे, रेकचंद पत्रे आदी होते. सहा लाखांची दारू आणि सहा लाखाची पिकअप व पाच लाख रुपयाची टवेरा कार असे एकूण 17 लाख रुपयांची मुद्देमालासह अवैध दारू जप्त केल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. अधिक तपास देसाईगंज पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक रवींद्र पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.