अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 5, 2021 04:36 AM2021-03-05T04:36:40+5:302021-03-05T04:36:40+5:30

बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पीएसआय निशा खोब्रागडे व मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित हाेते. बैठकीत तालुक्यातील ...

Illegal liquor, tobacco sellers will be prosecuted | अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार

अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई करणार

Next

बैठकीला सहायक पोलीस निरीक्षक नागनाथ पाटील, पीएसआय निशा खोब्रागडे व मुक्तिपथचे तालुका संघटक आनंद इंगळे उपस्थित हाेते.

बैठकीत तालुक्यातील त्रासदायक गावांची व ठोक विक्रेत्यांच्या नावांची यादी तयार करण्यात आली. शहर व गावातील अवैध दारू, तंबाखू विक्रेत्यांवर कारवाई होणे आवश्यक आहे. त्यासाठी दोन गावे टार्गेट करणे. दर महिन्याला तालुका पोलीस अधिकारी, बिट अंमलदार, पोलीस पाटील व मुक्तिपथची बैठक होईल. गावातील विक्रेत्यांची माहिती मिळवून पोलीस पाटील व बिट अंमलदार कारवाई करणार. तालुक्यातील अडचणीवर चर्चा करण्यासाठी उपविभागीय पोलीस अधिकारी यांच्याशी दोन महिन्यातून चर्चा करून निर्णय घेणे. दर आठवड्याला ज्या गावात रेड करायची आहे त्याची प्लॅनिंग व पाठपुरावा करणे. आदी विषयांवर चर्चा करण्यात आली. तालुक्यातील दारू व तंबाखू विक्रेत्यांवर एक्शन प्लॅननुसार कारवाई करण्यासाठी पोलीस प्रशासन सज्ज झाले आहे.

Web Title: Illegal liquor, tobacco sellers will be prosecuted

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.