पावीमुरांडात अवैध उत्खनन

By admin | Published: May 29, 2017 02:37 AM2017-05-29T02:37:52+5:302017-05-29T02:37:52+5:30

चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील मामा तलावाच्या हद्दित अवैधरित्या मुरूम व मातीचे उत्खनन करून

Illegal mining in Pavimurand | पावीमुरांडात अवैध उत्खनन

पावीमुरांडात अवैध उत्खनन

Next

खनिकर्म अधिकाऱ्यांनी दिले कारवाईचे आश्वासन : अण्णा हजारे विचार मंचच्या पदाधिकाऱ्यांची तक्रार
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : चामोर्शी तालुक्यातील पावीमुरांडा येथील मामा तलावाच्या हद्दित अवैधरित्या मुरूम व मातीचे उत्खनन करून सदर मुरूम पावीमुरांडा ते घोट या मार्गावर टाकला जात असल्याचा आरोप अण्णा हजारे विचारमंचच्या पदाधिकाऱ्यांनी केला आहे.
पावीमुरांडा हे गाव व तलाव कक्ष क्रमांक ३१ मध्ये येते. या तलावावर अशोक प्रतापराव रायसिडाम व त्यांच्या परिवाराचा हक्क आहे. या मामा तलावातून अवैधरित्या पोकलँड मशीनच्या सहाय्याने मुरूम व मातीचे उत्खनन केले जात आहे. खोदकाम केलेले मुरूम सहा टिप्परच्या मदतीने पावीमुरांडा ते घोट मार्गावर टाकण्यात येत आहे. मामा तलावातील मुरूम व माती खोदकाम करणाऱ्या कंत्राटदाराच्या नावाबाबत अण्णा हजारे विचारमंचच्या सदस्यांनी चौकशी केली. मात्र नाव माहित पडले नाही. सदर कंपनी पुणे येथील असल्याचे सांगण्यात आले. मुरूम व माती खोदकामाच्या वेळी पोकलँड मशीनच्या सहाय्याने काही झाडे मूळासकट पाडण्यात आली. अवैध उत्खनन सुरू असतानाही संबंधित तलाठ्यांनी कोणतीही कारवाई केली नाही. त्यामुळे तलाठ्यांचाही यामध्ये हात असल्याची शक्यता नाकारता येत नाही. अवैध उत्खननाबातची माहिती जिल्हा खनिकर्म अधिकारी यांना देण्यात आली असून याबाबतची चौकशी करू, असे आश्वासन दिले आहे. झाडे पाडण्याबाबतची माहिती वन विभागाला दिली आहे. या सर्व प्रकाराची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी, अशी मागणी अण्णा हजारे विचारमंचचे बसंतसिंह बैस, अनुरथ निलेकर, देवेंद्र ब्राह्मणवाडे यांनी केली आहे.

Web Title: Illegal mining in Pavimurand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.