राष्ट्रीय महामार्गावर बेकायदेशीररित्या टोल वसुली?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2021 04:34 AM2021-08-01T04:34:16+5:302021-08-01T04:34:16+5:30
देसाईगंज : कोरोनामुळे आधीच जेरीस आलेल्या वाहन मालक-संचालकांकडून ब्रह्मपुरी ते नागपूर महामार्गावरील खरबी टोल प्लाझावर बेकायदेशीररित्या टोल वसुली करण्यात ...
देसाईगंज : कोरोनामुळे आधीच जेरीस आलेल्या वाहन मालक-संचालकांकडून ब्रह्मपुरी ते नागपूर महामार्गावरील खरबी टोल प्लाझावर बेकायदेशीररित्या टोल वसुली करण्यात येत असल्याची तक्रार देसाईगंजच्या वाहन मालकांनी ना. विजय वडेट्टीवार यांच्याकडे केली. याप्रकरणी संबंधितांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी त्यांनी निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनानुसार, संबंधित मिनीबस संचालक ठरावीक अंतराने वडसा-नागपूर, नागपूर-वडसा मिनी बसेस चालवून आपली उपजीविका चालवित आहेत. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे संपूर्ण व्यवसाय प्रभावित झाले असतानाही चालक, वाहक, कमिशन एजंट व व्यवसायाशी संबंधित सर्व लोकांना सांभाळून व्यवसाय करण्यात येत आहे. असे असताना खरबी टोल प्लाझावर दि. ३० जुलैपासून फास्ट टॅग टोल रकमेची वसुली सुरू करण्यात आली. विशेष म्हणजे हे टोल कर्मचारी कुठलीही पावती न देता धमकावून, बेकायदेशीररित्या वसुली करीत असल्याचे त्यांनी आपल्या तक्रारीत म्हटले आहे. पावतीबाबत टोल कर्मचाऱ्यांना विचारणा केली असता बसेस बंद करण्याची धमकी दिली ते देतात. यामुळे बस संचालक चांगलेच संतापले आहेत. ही बेकायदेशीर टोल वसुली थांबवून वसुली करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मागणी निवेदनातून वाहन मालक संचालक संघटनेने केली आहे.
निवेदनावर संघटनेचे संचालक किशोर मेश्राम, बंटी मेश्राम, मोहम्मद खान, पुरुषोत्तम तोंडरे, शीतल बोरकर, संकेत हिंगे, अनवर अली सैय्यद, मुझफ्फर अली सैय्यद, रामचंद्र झोडापे, नागेश्वर फाये, रणदीपसिंग चावला, आनंदसिंग चावला, गणेश दिघोरे, पवन बांबोळे, गणेश भोयर, राजकुमार गजभिये, प्रशांत बोरकर, हिरालाल मेश्राम आदींच्या सह्या आहेत.
310721\1751-img-20210731-wa0046.jpg
चालक संघटनेचे प्रमुख किशोर मेश्राम निवेदन देतांना विजय वडेट्टीवार मदत व पुनर्वसन व चंद्रपुर जिल्हा पालकमंञी