अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2017 11:24 PM2017-12-12T23:24:06+5:302017-12-12T23:24:32+5:30

आरमोरी बिटअंतर्गत येत असलेल्या अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे.

An illegal tree plantation in the Arsaoda forest grew | अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली

अरसोडा जंगलात अवैध वृक्षतोड वाढली

Next
ठळक मुद्देजंगलाच्या सभोवताल ओल्या सरपणाचे ढीग : लहान वृक्षांची मोठ्या प्रमाणात कत्तल

आॅनलाईन लोकमत
जोगीसाखरा : आरमोरी बिटअंतर्गत येत असलेल्या अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये मागील एक महिन्यापासून मोठ्या प्रमाणात वृक्षतोड केली जात आहे. जंगलाला लागून असलेल्या शेतांमध्ये ओल्या सरपणाचे मोठमोठे ढीग दिसून येत आहेत.
ग्रामीण भागातील बहुतांश नागरिक अजूनही चुलीवरच सरपणाच्या मदतीने स्वयंपाक करतात. शेतीची कामे संपली असल्याने ग्रामीण भागातील नागरिक आता वर्षभर पुरेल एवढे सरपण गोळा करीत आहेत. जंगलात जाऊन जीवंत झाडे तोडली जात आहेत. सदर झाडे तोडून जंगलाशेजार असलेल्या शेतांमध्ये ठेवली जात आहे. रात्रीच्या सुमारास बैलबंडीच्या सहाय्याने सदर सरपण रात्री आणले जात आहे. यामध्ये हजारो वृक्षांची मोठ्या प्रमाणात तोड होत आहे. मात्र शहरात राहून वेतन उचलणाºया वनरक्षक व वनपालाला ही बाब माहित नसावी. जंगलाच्या संरक्षणासाठी वनरक्षक येत नाही. ही बाब गावातील नागरिकांना पक्की माहित असल्याने नागरिक खुलेआम वृक्षांची तोड करीत आहेत. यामुळे कोट्यवधी रूपयांची वनसंपदा नष्ट होत चालली आहे. एक रोपटे जगविण्यासाठी शासनाला हजार ते दोन हजार रूपये खर्च करावे लागतात. अरसोडा जंगलातील कक्ष क्र. ६७ मध्ये अनेक लहान वृक्ष आहेत. सदर वृक्षांची लहान असतानाच तोड केली जात असल्याने संपूर्ण जंगल नष्ट होण्याचा धोका निर्माण झाला आहे. याकडे वरिष्ठ अधिकाºयांनी लक्ष घालून सदर वनरक्षकास जंगल संरक्षणाचे काम करण्याचे सक्त निर्देश द्यावे, अशी मागणी होत आहे.
जंगलाच्या जवळपास सरपन जमा करून ठेवलेल्या एका नागरिकाला लोकमत प्रतिनिधीने विचारले असता अरसोडा येथे अजूनपर्यंत गॅसचे वितरण करण्यात आले नाही. त्यामुळे नागरिकांना सरपणाच्या मदतीने स्वयंपाक करावा लागत असल्याने झाडांची तोड केल्याशिवाय पर्याय नाही. मागेल त्याला गॅस देण्याचे धोरण शासनाने अवलंबिले आहे. वन विभाग सुद्धा गॅसचे वितरण करून तीन वर्ष मोफत गॅस भरून देते. तरीही या गावातील नागरिकांना गॅस कशी काय मिळाली नाही, याची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Web Title: An illegal tree plantation in the Arsaoda forest grew

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.