डिजिटल युगाचा हस्तकला व्यवसायावर परिणाम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2021 05:06 AM2021-03-13T05:06:39+5:302021-03-13T05:06:39+5:30

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, अतिसंवेदनशील व जंगलाने व्यापलेला असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आढळून येते. या ठिकाणी बांबू ...

Impact of the digital age on the craft business | डिजिटल युगाचा हस्तकला व्यवसायावर परिणाम

डिजिटल युगाचा हस्तकला व्यवसायावर परिणाम

googlenewsNext

गडचिरोली जिल्हा हा अतिदुर्गम, अतिसंवेदनशील व जंगलाने व्यापलेला असून या जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात जंगल आढळून येते. या ठिकाणी बांबू , सागवान इतर सिसमची लाकडे मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.

एवढ्या दिवसांपासून लाकडांपासून साहित्य बनविणे मोठ्या प्रमाणात होते. परंतु, आता लाकडाची जागा अन्य लोखंडी व अन्य वस्तूने घेतल्याने ग्रामीण भागासह शहरी भागातही लाकडाचे तसेच बांबूचे साहित्य फारच कमी प्रमाणात होत असल्याचे दिसून येत आहे.

ग्रामीण भागात शेती संरक्षणाकरिता व सिमेंट पोल तसेच नांगर आधी साहित्य लाकडापासून बनवून त्या माध्यमातून शेती करीत होते. आता त्याची जागा ट्रॅक्टरने घेतली आहे, तर घरात बांबूपासून बनवलेल्या टोपल्या, पत्रे ठेवण्याचा डबा आधी विविध वस्तू आपल्या स्वतःचा कलेने नागरिक बनवायचे तसेच आपल्याला साहजिकच उपलब्ध व्हायचे. आता हे सर्व साहित्य कामापुरते झाल्याचे दिसून येत आहे. आता कामानिमित्त टोपली व काहीही घ्यायचे असले, तरी दमछाक होत आहे.

सध्या वापर करा आणि फेकून द्या, अशा पद्धतीमुळे लोखंड व प्लास्टिकच्या वस्तूंनी त्यांची जागा घेण्यास सुरुवात केली, त्यामुळे बांबूपासून निर्मित वस्तू या काळात मात्र शोभेची वास्तू ठरले आहे. अजूनही ग्रामीण व शहरी भागात वस्तू बनविणारे कारागीर मोठ्या प्रमाणात आहे. त्या वस्तूंच्या बाजारपेठांमध्ये मागणी कमी झालेला आहे.

परिणामी, आताचे युग डिजिटल युग म्हणून संबोधले असले, तरी आज कलाकृतीची गरज भासत आहे. सुरुवातीला या वस्तू मानवाच्या विविध उपयोगात येत होत्या. मात्र, या वस्तू घराच्या दर्शनी भागात शोभेसाठी ठेवण्यात येत आहे.

Web Title: Impact of the digital age on the craft business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.