जि.प.तील कामकाज प्रभावित
By admin | Published: July 17, 2016 01:07 AM2016-07-17T01:07:02+5:302016-07-17T01:07:02+5:30
जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यास नि:शुल्क शिक्षण ...
लेखणीबंद आंदोलन सुरू : लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी केली निदर्शने
गडचिरोली : जिल्हा परिषदेच्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांच्या ग्रेड पे मध्ये सुधारणा करण्यात यावी, कर्मचाऱ्यांच्या पाल्यास नि:शुल्क शिक्षण सवलत मिळावी, यासह विविध मागण्यांसाठी जि.प.च्या लिपीकवर्गीय कर्मचाऱ्यांनी जिल्हाभरात शनिवारपासून बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. जि.प.च्या समोर कर्मचाऱ्यांनी निदर्शने करून शासनाचे लक्ष वेधून घेतले. सदर लेखणीबंद आंदोलनामुळे जिल्हा परिषदेचे प्रशासकीय कामकाज ठप्प झाले.
जिल्ह्याच्या बाराही पंचायत समिती, प्राथमिक आरोग्य केंद्र, जि.प.संपूर्ण विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बेमुदत लेखणीबंद आंदोलन सुरू केले आहे. त्यामुळे तालुकास्तरावरीलही प्रशासकीय कामकाज ठप्प पडले. कर्मचारी शनिवारला आपली हजेरी नोंदविल्यानंतर कार्यालयात बसून होते. कार्यालयातील संगणकही सुरू केले नाही. फाईलही तशाच पडून होत्या. निदर्शनेदरम्यान संघटनेचे अध्यक्ष व्य. वि. कंबगोणी, डी. व्ही. दुमपट्टीवार, फिरोज लांजेवार, अखिल श्रीरामवार, गणेश सुंकरवार, माया बाळराजे, सुनिल लोखंडे, डी. बी. मारबते, टी. डी. सावरे, मनिषा गेडाम, खेवले, योगेश वैद्य, राजू हेमके, सुनिता आत्राम, पी. व्ही. उके, पी. डी. नरड आदी उपस्थित होते. कर्मचाऱ्यांच्या शिष्टमंडळाने मागण्यांचे निवेदन जि.प. अध्यक्ष प्रशांत कुत्तरमारे यांना दिले. (स्थानिक प्रतिनिधी)