कोटपा कायद्याची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 1, 2019 11:58 PM2019-06-01T23:58:29+5:302019-06-01T23:59:10+5:30
तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले. स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : तंबाखू विक्रीवर नियंत्रण ठेवण्यासाठी शासनाने कोटपा कायदा केला आहे. या कायद्याची प्रशासनाने कडक अंमलबजावणी करावी, असे आवाहन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांनी केले.
स्थानिक जिल्हा सामान्य रूग्णालयात जागतिक तंबाखू नकार दिनाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमाचे उद्घाटन पालकमंत्री अम्ब्रीशराव आत्राम यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी ते मार्गदर्शन करीत होते. कार्यक्रमाला आमदार कृष्णा गजबे, नगराध्यक्ष योगीता पिपरे, नगरसेवक प्रमोद पिपरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अनिल रूडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. शशिकांत शंभरकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. माधुरी किलनाके, महिला व बाल रूग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. दीपचंद सोयाम, डॉ. भागराज धुर्वे, बाह्य संपर्क अधिकारी डॉ. शिवनाथ कुंभारे, जिल्हा न्यायाधीश पाटील, मुक्तीपथचे संचालक डॉ. मयूर गुप्ता आदी मान्यवर उपस्थित होते. पुढे मार्गदर्शन करताना पालकमंत्री म्हणाले, जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थांचे व्यसन वाढले आहे. तंबाखूच्या व्यसनामुळे नागरिक विविध आजारांना बळी पडत आहेत. मुक्तीपथच्या माध्यमातून जिल्ह्यात तंबाखूविरोधी जनजागृती केली जात आहे. मुक्तीपथच्या या उपक्रमाचे पालकमंत्र्यांनी कौतुक केले. संचालन डॉ. नंदू मेश्राम तर आभार डॉ. माधुरी किलनाके यांनी मानले. कार्यक्रमासाठी स्नेहल संतोषवार, महेश देशमुख, निलेश सुबेदार, दिनेश खोरगडे, मिना दिवटे, राहूल कंकनालवार, गोपाल पेंदाम, सिमा बिश्वास, प्रणाली ठेंगणे, रिना मेश्राम यांच्यासह जिल्हा सामान्य रूग्णालयात इतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.
जनजागृतीवर भर द्या -आ. कृष्णा गजबे
पथनाट्य, रॅली आदींच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये तंबाखूच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली पाहिजे. तंबाखूला दूर करण्याकरिता स्वत:च्या मनाचे बळकटीकरण करणे अत्यंत आवश्यक असल्याचे प्रतिपादन आमदार कृष्णा गजबे यांनी केले. तंबाखू नियंत्रणासाठी शासनाने केलेल्या कोटपा कायद्याची अंमलबजावणी केली जावी. जे या कायद्याचे उल्लंघन करतील त्यांच्यावर कारवाई करण्याचे निर्देशही आमदारांनी दिले.
रूग्णालयात मॉड्युलर लेबर रूम
महिला व बाल रूग्णालयात सीएसएसडी, मॉड्युलर लेबर रूम आणि अॅडव्हॉन्स स्किल लॅब फॉर बर्थ अटेंडन्सचे उद्घाटन पालकमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्र्यांनी महिला व बाल रूग्णालयाच्या स्थितीचा आढावा जाणून घेतला. तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून महिला व बाल रूग्णालयातून रॅली काढण्यात आली. या रॅलीदरम्यान तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत नारे देण्यात आले. यामध्ये आरोग्य कर्मचारी सहभागी झाले होते.