सेतू अभ्यासक्रमाची अंमलबजावणी करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:37 AM2021-07-31T04:37:00+5:302021-07-31T04:37:00+5:30
गडचिराेली : काेराेनामुळे जिल्हाभरातील प्राथमिक शाळा बंद असल्या, तरी विविध उपाययाेजना करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. प्रत्येक वर्गासाठी सेतूने ...
गडचिराेली : काेराेनामुळे जिल्हाभरातील प्राथमिक शाळा बंद असल्या, तरी विविध उपाययाेजना करून शिक्षकांनी विद्यार्थ्यांना अध्यापन करावे. प्रत्येक वर्गासाठी सेतूने अभ्यासक्रम निश्चित करण्यात आला आहे. या अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करावी, असे आवाहन शिक्षणाधिकारी हेमलता परसा यांनी केले.
आरमाेरी येथील गटसाधन केंद्राच्या सभागृहात ३० जुलै राेजी तालुक्यातील सर्व व्यवस्थापनाच्या उच्च प्राथमिक व माध्यमिक मुख्याध्यापकांची आढावा सभा सेतू अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी या विषयावर घेण्यात आली. याप्रसंगी त्या मार्गदर्शन करीत हाेत्या. यावेळी जिल्हा परिषद सदस्य संपत आळे, गटशिक्षणाधिकारी नरेंद्रकुमार काेकुडे, शिक्षण विस्तार अधिकारी लता चाैधरी, गुलाबसिंग राठाेड, गटसमन्वयक कैलास टेंभुर्णे आदी उपस्थित हाेते.
यावेळी शिक्षणाधिकारी परसा यांनी आधारकार्ड, सरल, शिष्यवृत्ती, मानव विकास मिशन आदींचा आढावा घेतला. गटशिक्षणाधिकारी काेकुडे यांनी सेतू अभ्यासक्रमाची निर्मिती, महत्त्व, मूल्यमापन, अभिलेख व अंमलबजावणी या विषयावर मार्गदर्शन केले. शिक्षकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे दिली. प्रास्ताविक विषय साधन व्यक्ती डब्ल्यू.झेड. खेडकर, संचालन सुनंदा गिरीपुंजे, तांत्रिक साहाय्य अविनाश झिलपे, तर आभार साेनाली कात्रटवार यांनी मानले.