ध्येयवेड्या शिक्षकाची संगीत क्षेत्रावर छाप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:38 AM2021-09-03T04:38:05+5:302021-09-03T04:38:05+5:30

चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर या गावातील रहिवासी असलेले व सध्या जि. प. कन्या शाळा, गोंडपिपरी येथे व्यवसायाने विषय शिक्षक ...

Impressions are gained in a fluid, global, diffused way | ध्येयवेड्या शिक्षकाची संगीत क्षेत्रावर छाप

ध्येयवेड्या शिक्षकाची संगीत क्षेत्रावर छाप

Next

चामोर्शी तालुक्यातील कृष्णनगर या गावातील रहिवासी असलेले व सध्या जि. प. कन्या शाळा, गोंडपिपरी येथे व्यवसायाने विषय शिक्षक पदावर कार्यरत आहेत. मुरलीधर सरकार असे या शिक्षकाचे नाव आहे. त्यांनी प्राथमिक शिक्षण गावातील जि. प. शाळेत घेेतले, तर माध्यमिक शिक्षण शिवाजी हायस्कूल, चामोर्शी येथून आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोमनवार कनिष्ठ महाविद्यालयातून पूर्ण केले.

उपक्रमशील आणि विद्यार्थीप्रिय शिक्षक म्हणून त्यांची सर्वत्र ओळख आहे. त्यांच्या शेकडो कविता आणि लेख विविध वृत्तपत्रांतून प्रकाशित केले आहेत. शिक्षण क्षेत्रात आणि कला क्षेत्रात कित्येक पुरस्कारांचे मानकरी ठरले आहेत. कोरोनायोद्धा म्हणून कार्य करीत असताना ते रुग्णांच्या कुटुंबीयांना निःशुल्क रुग्णवाहिका उपलब्ध करून देत आहेत. विद्यादानासोबतच निर्माता /निर्देशक म्हणून एका मराठी गतांच्या अल्बममधून ते प्रेक्षकांसमोर अगदी थोड्याच कालावधित येणार आहेत.

सळसळत्या रक्ताच्या तरुणाईला थिरकवणारे असे त्यांचे स्वरचित प्रेमगीत, तर कोरोना महामारीत आई - वडिलांची छत्रछाया हरविलेल्या पाल्यांच्या व्यथा समाजापर्यंत व्हिडीओ अल्बमच्या माध्यमातून रूपेरी पडद्यावर झळकणार आहेत. मुरलीधर सरकार या ध्येयवेड्या शिक्षकाने तरुणांमध्ये उत्साह निर्माण करण्यासाठी मराठी गाण्यांचा "प्रेमाचे गुंतले धागे" हा अल्बम तयार केला आहे.

020921\img-20210902-wa0062.jpg

ध्येयवेड्या व जिद्दी शिक्षकाची आगळी वेगळी छाप

Web Title: Impressions are gained in a fluid, global, diffused way

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.