गडचिराेलीत एका शाळेला भाेपळा तर एक काठावर पासl; चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आत
By गेापाल लाजुरकर | Published: June 2, 2023 05:30 PM2023-06-02T17:30:51+5:302023-06-02T17:32:03+5:30
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
गडचिराेली : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाने शुक्रवार २ जून राेजी इयत्ता १० वीचा निकाल जाहीर केला. निकालामुळे ‘कही खुशी, कही गम’ असे चित्र पाहायला मिळाले. गडचिराेली जिल्ह्याचा दहावीचा निकाल ९२.५२ टक्के लागला. ही टक्केवारी समाधानकारक असली तरी जिल्ह्यातील एका शाळेला भाेपळा मिळाला म्हणजेच शून्य टक्के निकाल लागला. एका शाळेने ३५ टक्के निकाल दिला. तर एकूण चार शाळांचा निकाल ५० टक्क्यांच्या आतच लागला.
गडचिराेली जिल्ह्यात एकूण १४ हजार ९०६ विद्यार्थ्यांनी इयत्ता दहावीच्या परीक्षेसाठी नाेंदणी केली हाेती. यापैकी १४ हजार ४५५ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. परीक्षा दिलेल्यांपैकी १३ हजार ३७४ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. जिल्हा मुख्यालयात असलेल्या संत गाडगे महाराज विद्यालयाला अशीच निराशा आली. विद्यालयातील एकूण ७ विद्यार्थी परीक्षेला प्रविष्ट झाले हाेते. यापैकी एकही विद्यार्थी उत्तीर्ण झाला नाही.
याशिवाय धानाेरा तालुक्याच्या रांगी येथील कै. हरीजी विठूजी मडावी विद्यालयाचा निका ३५ टक्के, काेरची तालुक्याच्या बेळगाव घाट येथील महात्मा जाेतिबा फुले शाळेचा निकाल ४० टक्के, मुलचेरा तालुक्यातील श्रीनगरच्या देशबंधू चित्तरंजन हायस्कूलचा निकाल ४२ टक्के तर कुरखेडा तालुक्याच्या गाेठणगाव येथील शिरीश केंद्रीय निवासी माध्यमिक आश्रमशाळेचा निकाल ४३.४७ टक्के लागला.