मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान

By गेापाल लाजुरकर | Published: November 20, 2024 02:53 PM2024-11-20T14:53:57+5:302024-11-20T14:55:09+5:30

प्रशासनातर्फे साेय : गृहमतदानाची साेय नाकारून तरुणांना दिला संदेश

In Mulchera taluka, 111-year-old grandmother went to the booth and cast her vote | मुलचेरा तालुक्यात १११ वर्षांच्या आजीने प्रत्यक्ष बुथवर जाऊन केले मतदान

In Mulchera taluka, 111-year-old grandmother went to the booth and cast her vote

गडचिरोली : विधानसभेसाठी मतदार मोठ्या उत्साहाने मतदानासाठी बाहेर पडले आहेत. सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. लोकशाहीच्या या उत्सवात तरुण मतदारांनाही लाजवेल असा उत्साह ज्येष्ठ व वयाेवृद्ध मतदारांमध्ये दिसून आला. मुलचेरा तालुक्याच्या गाेविंदपूर येथील १११ वर्षांच्या फुलमती बिनाेद सरकार या आजीने गृहमतदानाच्या साेयीचा लाभ न घेता प्रत्यक्ष बुथवर जाऊन मतदान केले.

गोविंदपूर येथील फुलमती सरकार यांचा जन्म १ जानेवारी १९१३ रोजी झाला. आजीला चालता येत नसल्याने प्रशासनाने चारचाकी वाहन आणि व्हीलचेअरची व्यवस्था केली. आजीने प्रत्यक्ष मतदान करत मतदारांमध्ये उत्साह निर्माण केला. आजींच्या मतदानाचा उत्साह कौतुकास्पद होता, तर मतदानाकडे पाठ फिरविणाऱ्या तरुण वर्गासाठी १११ वर्षांच्या आजींचा हा उत्साह आदर्शवत ठरला.

मतदानाबाबत बांगला भाषेत केले आवाहन
लोकशाहीच्या उत्सवात फुलमती सरकार या आजींनी प्रत्यक्ष सहभाग घेऊन मतदान केले. त्यांनी गृह मतदान नाकारून लोकशाहीच्या उत्सवात प्रत्यक्ष सहभाग घेतला. एवढेच नव्हे तर तिने आपल्या बांगला भाषेत सर्वांना मतदान करण्याचे आवाहन देखील केले.

प्रशासनाने उपलब्ध केले वाहन
फुलमती बिनोद सरकार या आजीला प्रशासनाने चारचाकी वाहनातून मतदान केंद्रावर आणले. त्यांनतर शालेय विद्यार्थी, गावकरी तसेच प्रशासनातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी पुष्पांचा वर्षाव करत मतदान केंद्राच्या आवारात स्वागत केले. अहेरीचे अपर जिल्हाधिकारी विजय भाकरे यांनी फुलमती सरकार यांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले.

Web Title: In Mulchera taluka, 111-year-old grandmother went to the booth and cast her vote

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.