आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात खर्रामध्ये वापरला जातोय केमिकलयुक्त तंबाखू

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 12:48 PM2024-09-05T12:48:23+5:302024-09-05T12:49:20+5:30

यंत्रणा सुस्त : वडधा परिसरात गोरखधंदा

In Waddha area of Armori taluka chemical tobacco is being used in khara | आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात खर्रामध्ये वापरला जातोय केमिकलयुक्त तंबाखू

In Waddha area of Armori taluka chemical tobacco is being used in khara

लोकमत न्यूज नेटवर्क 
वडधा :
आरमोरी तालुक्यासह गडचिरोली जिल्ह्यात नशेच्या पदार्थावर बंदी असली तरी मात्र त्याचा सर्रासपणे पुरवठा केला जात आहे. आरमोरी तालुक्यातील वडधा परिसरात खर्रामध्ये बनावट केमिकलयुक्त तंबाखूचा वापर मोठ्या प्रमाणात केला जात आहे. या भागात दिवसाढवळ्या खुलेआम मज्जा इगल केमिकल युक्त बनावट सुगंधी तंबाखूचा देऊळगाव मार्गाने पुरवठा केला जात असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.


बनावट तंबाखू हे सुगंधित केमिकलयुक्त असल्याने त्याचा विपरित परिणाम नागरिकांच्या आरोग्यावर होत असून खर्रामुळे कॅन्सर सारख्या भयंकर आजाराचे बळी सुद्धा ठरत आहेत. अन्न व औषध प्रशासन विभाग तसेच पोलिस प्रशासनाचे या बाबीकडे पूर्णतः दुर्लक्ष होत आहे.


खर्राचा शौक पुरुष व महिला तसेच लहान मुलांमध्ये दिसून येत आहे. बनावट तंबाखूचा खुलेआम पुरवठा करून नागरिकांच्या आरोग्याशी खेळ खेळला जात आहे. बनावट तंबाखू पुरवठा करून झटपट पैसे कमविण्याच्या नादात अनेक नागरिकांचे आरोग्याशी खेळला जात असल्याचा गोरखधंदा गेल्या अनेक दिवसापासून वडधा परिसरात सुरू आहे. तंबाखू पुरवठा करणाऱ्यांवर केव्हा कारवाई करणार ? की नागरिकांच्या मृत्यूची वाट पाहणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. 


"खर्रा खाणे आरोग्याला घातकच आहे. खर्रा खाणारे काही रुग्ण दवाखान्यांमध्ये येत असतात आणि ते तोंडाच्या आजारासंदर्भात मला माहिती देत असतात. आरोग्यावर त्याचे विपरित परिणाम होतात. त्यामुळे खर्रा खाऊ नये. दिवसाला दोन खरें खाल्ले तर चाळीस रुपये जात असतात. अशावेळी आपण त्याच पैशाचे काजू, किसमिस खाल्ले तर आपल्या आरोग्याला अधिक पोषक वातावरण मिळेल."
- डॉ. पवन राऊत, आरोग्य अधिकारी, प्राथमिक आरोग्य केंद्र वडधा


 

Web Title: In Waddha area of Armori taluka chemical tobacco is being used in khara

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.