सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 06:00 AM2019-12-03T06:00:00+5:302019-12-03T06:00:28+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा ...

Inauguration of cultural festival | सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

सांस्कृतिक महोत्सवाचे थाटात उद्घाटन

Next
ठळक मुद्देकुलगुरू डॉ.कल्याणकर : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न समाजाची निर्मिती होते

लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : सांस्कृतिक महोत्सवातून कलासंपन्न मानवी समाजाची निर्मिती होत असते. तसेही चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया व भंडारा या चार जिल्ह्याने झाडीपट्टी रंगभूमीच्या माध्यमातून आपला सांस्कृतिक वारसा जोपासला आहे. गोंडवाना विद्यापीठाअंतर्गत शिक्षण घेत असलेले विद्याथी कुठेही मागे नाहीत. कलाकृती व अविष्कार त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरून आहे. विद्यार्थ्यांनी संधीचे सोने करून आपला कलाविष्कार दाखवावा, असे आवाहन गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.व्ही.कल्याणकर यांनी केले.
१७ वा आंतरविद्यापीठ सांस्कृतिक महोत्सव ‘इंद्रधनुष्य-२०१९’ च्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे यांच्या हस्ते सोमवारी विद्यापीठाच्या प्रांगणात या महोत्सवाचे उद्घाटन झाले. विद्यापीठाच्या परिसरात प्रशस्त शामियानात झालेल्या या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून विद्यापीठाचे प्र-कुलगुरू डॉ.चंद्रशेखर भुसारी, राजभवन निरिक्षण समितीचे डॉ.सुनील पाटील, वित्त प्रबंधन समितीचे अध्यक्ष डॉ.एम. बी. पाटील, सदस्य डॉ.विजया पाटील, डॉ.ज्ञानोबा मुंडे, डॉ.वाणी लातुरकर, राजू हिवसे आणि विद्यापीठाचे कुलसचिव डॉ.ईश्वर मोहुर्ले आदी मान्यवर मंचावर विराजमान होते.
कुलगुरू डॉ.कल्याणकर यांनी गोंडवाना विद्यापीठ हे भौगोलिकदृष्ट्या वेगळ्या अवस्थेत असून अविकसीत आहे. त्यामुळे या विद्यापीठाला अजुनही हेल्पिंग हॅन्ड्सची गरज व्यक्त केली. कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे म्हणाले, गोंडवाना विद्यापीठ हे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठातूनच निर्माण झाले आहे. त्यामुळे या विद्यापीठाबद्दल माझ्यामध्ये पालकत्वाची भावना आहे. सदर विद्यापीठासाठी जे काही सहकार्य लागेल, ते आपण करू, असे ते म्हणाले.
प्रास्ताविकात कुलसचिव डॉ. ईश्वर मोहुर्ले यांनी विद्यापीठाच्या वाटचालीची आणि युवा महोत्सवाची पार्श्वभूमी सांगितली. संचालन प्रा.डॉ. नरेंद्र आरेकर यांनी तर आभार विद्यार्थी विकास विभागाच्या संचालिका तथा महोत्सवाच्या संयोजिका डॉ.प्रिया गेडाम यांनी मानले.
कार्यक्रमाला विद्यापीठांतर्गत अधिसभा, विद्वत, व्यवस्थापन परिषदेसह सर्व प्राधिकरणाचे सदस्य तसेच विविध विद्याशाखांचे अधिष्ठाता, शिक्षण संस्थाचालक, प्राचार्य, प्राध्यापक, तसेच शेकडो विद्यार्थी उपस्थित होते.

पहिले कुलगुरू आर्इंचवार यांचा गौरव
या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर गोंडवाना विद्यापीठाचे पहिले कुलगुरू डॉ.विजय आर्इंचवार यांचा कुलगुरू डॉ.एन. व्ही. कल्याणकर यांच्या हस्ते शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह देऊन गौरव करण्यात आला. कार्यक्रमापूर्वी सर्व विद्यापीठांच्या चमुंच्या सांस्कृतिक रॅलीने कॉम्प्लेक्स परिसरातील नागरिकांचे लक्ष वेधले.

आज होणार या कलांचे सादरीकरण
सोमवारी उद्घाटन सत्रानंतर दुपारी स्थळचित्र आणि लोकसंगीत वाद्य स्पर्धा झाल्या. मंगळवारी सकाळी ९.३० पासून सुगम संगीत (भारतीय), पोस्टर मेकिंग, नकला, भारतीय समूहगान, चिकटकला (कोलाज) आणि एकांकिका स्पर्धा होणार आहेत. या सर्व स्पर्धा वेगवेगळ्या ४ मंचांवर एकाचवेळी सुरू राहणार आहेत.

Web Title: Inauguration of cultural festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.