चार कुरमाघरांचे उद्घाटन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 17, 2021 04:25 AM2021-06-17T04:25:21+5:302021-06-17T04:25:21+5:30
आदिवासी समाजात महिलांना मासिक पाळीच्या दिवसात कुटुंबापासून अलग झोपडीत राहावे लागते, अशी प्रथा आहे. त्यामुळे अशा महिलांना अनेक ...
आदिवासी समाजात महिलांना मासिक पाळीच्या दिवसात कुटुंबापासून अलग झोपडीत राहावे लागते, अशी प्रथा आहे. त्यामुळे अशा महिलांना अनेक त्रास सहन करावे लागतात. त्यामुळे धानोरा तालुक्यात मुकुल माधव फाउंडेशनच्या आर्थिक साहाय्याने व खेरवाडी सोशल वेल्फेअर असोसिएशन मुंबई यांच्या पुढाकाराने धानोरा तालुक्यातील कन्हारटाेला, एरंडी, पवनी टोला, वागभूमी या चार गावांत नव्याने टाकाऊ प्लास्टीक बॉटलचा वापर करून आवश्यक सोईसुविधायुक्त कुरमाघर बांधण्यात आले. त्यांचे उद्घाटन करण्यात आले.
यावेळी नायब तहसीलदार दामोदर भगत, डॉ.आनंद बंग, विशाल हरडे, निखिल राऊत, विलास कांबळे, प्रशांत मंदावार, युवा परिवर्तन संस्था प्रमुख अमोल ठवरे, तसेच गावातील महिला पुरुष उपस्थित होते.