मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना निराेप, नवीन जिल्हाधिकारी रुजू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 24, 2021 04:41 AM2021-08-24T04:41:02+5:302021-08-24T04:41:02+5:30

अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने साेमवारी दीपक सिंगला यांच्यासाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यावेळी सर्वच अधिकारी ...

Inauguration of the new District Collector | मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना निराेप, नवीन जिल्हाधिकारी रुजू

मावळत्या जिल्हाधिकाऱ्यांना निराेप, नवीन जिल्हाधिकारी रुजू

googlenewsNext

अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने साेमवारी दीपक सिंगला यांच्यासाठी निरोप समारंभाच्या कार्यक्रमाचे आयाेजन केले हाेते. यावेळी सर्वच अधिकारी वर्गाने जिल्हाधिकारी दीपक सिंगला यांच्या कारकिर्दीमधील कामांबाबत आठवणींना उजाळा दिला. कोविड काळात सामान्य नागरिक, लोकप्रतिनिधी व प्रशासन यांचा समन्वय साधून त्यांनी त्यांच्या नियोजन कौशल्यातून कोरोना संसर्ग रोखण्यात यश मिळविले, असे प्रतिपादन बहुतेक सर्वच अधिकारी वर्गाने केले. यावेळी नवनियुक्त जिल्हाधिकारी संजय मीना यांचेही स्वागत करण्यात आले.

निरोप समारंभाच्या कार्यक्रमात अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने नवीन जिल्हाधिकारी संजय मीना यांनी दीपक सिंगला यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला. यावेळी संजय मीना यांनी शेखर सिंह, दीपक सिंगला यांनी सुरू केलेल्या विकासात्मक कामांना आपणही पुढे नेणार असल्याचे सांगितले. या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी कुमार आशीर्वाद, प्रकल्प अधिकारी आशिष येरेकर, शुभम गुप्ता, अंकित, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, उपवनसंरक्षक कुमारस्वामी, उपजिल्हाधिकारी धनाजी पाटील, गंगाराम तळपादे, कल्पना ठुबे, विजया जाधव आदी उपस्थित हाेते. संचालन दहीकर यांनी तर आभार तहसीलदार कल्याणकुमार दहाट यांनी मानले.

बाॅक्स

काेविडदरम्यान जिल्ह्याची ताकद जगाला कळली- सिंगला

गडचिरोलीमध्ये कोविडदरम्यान सर्वांनी चांगले काम केले. यातून जिल्ह्याची ताकद सर्व जगाला कळली. जिल्हा भलेही विकासात थोडा मागे असेल पण कोविड रोखण्यासाठी जे सर्वांनी कार्य केले ते मी इतर ठिकाणी कुठे पाहिले नाही. आरोग्य विभागासह सर्वच यंत्रणांनी अतिशय चांगले कार्य केले. यामुळे संपूर्ण विदर्भातून आपल्याकडे कोरोना रुग्ण उपचारासाठी येत होते. दुर्गम भागातील रस्ते व पूल तसेच आरोग्य सुविधा पोहचविण्यासाठी माझ्या कालावधीत मी प्रयत्न केला. त्यामुळे भविष्यात नक्कीच त्याचा फायदा स्थानिकांना होईल, अशी आशा दीपक सिंगला यांनी व्यक्त केली.

Web Title: Inauguration of the new District Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.