वैनगंगेच्या तीरी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

By Admin | Published: March 17, 2016 01:43 AM2016-03-17T01:43:49+5:302016-03-17T01:43:49+5:30

यावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. ...

Inauguration of Wainganga's Tari Jal Jagruti Week | वैनगंगेच्या तीरी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

वैनगंगेच्या तीरी जलजागृती सप्ताहाचे उद्घाटन

googlenewsNext

पाणी वाचविणे काळाची गरज : अतिरिक्त जिल्हाधिकाऱ्यांचे आवाहन; कोटगल येथे कार्यक्रम
यावेळी आव्हाड यांनी पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्यामुळे दिवसेंदिवस पर्जन्यमान कमी होत आहे. भविष्यात अल्प पावसामुळे प्रगतीत अडथळे निर्माण होणार आहे. त्यामुळे पाणी वाचविणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन केले. या कार्यक्रमाला कोटगलच्या सरपंच वैशाली पोरेड्डीवार, कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सहायक अभियंता अनुराग सावलकर, बी. डी. समर्थ, उपसरपंच अनिल भोयर, पंचायत समितीचे उपसभापती किशोर गद्देवार, जिल्हा माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर, सामाजिक कार्यकर्ते मनोहर हेपट आदी उपस्थित होते. यावेळी जिल्ह्यातील १० नद्यांच्या जलाचे पूजन करून त्या जलाला सागरात अर्पण करण्यात आले. प्रास्ताविक कार्यकारी अभियंता ए. बी. भाके यांनी केले. संचालन दीपक भांडेकर, आभार आर. एस. परूळकर यांनी मानले. या कार्यक्रमाला शाळेचे विद्यार्थी, ग्रामस्थ व ग्रामपंचायत पदाधिकारी उपस्थित होते.

जलजागृती रथ गावाकडे रवाना
जलजागृती सप्ताहानिमित्त गावागावात प्रचार व प्रसिध्दी करण्यासाठी चित्ररथ तयार करण्यात आला आहे. या रथाला अप्पर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, माहिती अधिकारी प्रशांत दैठणकर यांनी हिरवी झेंडी दाखविली. यावेळी कार्यकारी अभियंता ए. बी. भाके, सरपंच वैशाली पोरेड्डीवार, पं.स. उपसभापती किशोर गद्देवार हादी उपस्थित होते. या रथाच्या माध्यमातून पाणी वाचवा, असा संदेश गावापर्यंत पोहोचविला जाणार आहे.

Web Title: Inauguration of Wainganga's Tari Jal Jagruti Week

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.