बदक पालनासाठी मिळणार प्रोत्साहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2018 10:54 PM2018-12-04T22:54:46+5:302018-12-04T22:55:06+5:30
शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : शेतकऱ्यांना शेतीसोबत जोडधंदा म्हणून बदक पैदास केंद्र दिले जाणार आहेत. बदक पालन करून शेती व्यवसायास जोड म्हणून अर्थिक उत्स्त्रोत वाढविण्याचा प्रयत्न शेतकऱ्यांनी केला पाहिजे. त्यासाठी वडसा येथील बदक पैदास केंद्राचा लाभ घ्यावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभागाचे सहायक आयुक्त डॉ. संगीता निरगुडकर यांनी केले.
कृषी विज्ञान केंद्र, कृषी विभाग, आत्मा व पशुसंवर्धन विभागाच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील गेवर्धा येथे शेतकरी प्रशिक्षणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. यावेळी मंचावर आत्माचे प्रकल्प संचालक डॉ. प्रकाश पवार, कृषी विज्ञान केंद्राचे कार्यक्रम समन्वयक संदीप कºहाडे, विषय विशेषज्ञ ज्ञानेश्वर ताथोड, डॉ. विक्रम कदम, कृषी अधिकारी किशोर सरदारे, मंडळ कृषी अधिकारी चव्हाण, कृषी पर्यवेक्षक व्ही. जी. मसराम, कृषी सहायक जी. के. जल्लेवार, कृषी मित्र योगेश नखाते, गेवर्धाचे सरपंच टिकाराम कोलेटी, उपसरपंच संदीप नखाते, पोलीस पाटील भाग्यरेखा वहतले आदी मान्यवर उपस्थित होते.
जनावरांचे कृत्रिम रेतन करून जातीवंत पशुधनामध्ये वाढ करण्याच्या दृष्टीने शेतकºयांनी प्रयत्न केले पाहिजे, तसेच जनावरांचे वेळोवेळी लसीकरण करून घेतले पाहिजे, असे आवाहन सहायक आयुक्त डॉ. निरगुडकर यांनी केले.
संदीप कºहाडे यांनी सेंद्रीय भाजीपाला व सेंद्रीय शेतमालाला असलेल्या वाढत्या मागणीमुळे शेतकºयांनी सेंद्रीय शेतीकडे वळावे, असे प्रतिपादन केले. तसेच सेंद्रीय शेतीमुळे जमिनीचे आरोग्य सुधारण्यास मदत होते, असे त्यांनी सांगितले. डॉ. प्रकाश पवार यांनी भाजीपाला लागवड, कुक्कुटपालन, आळंबी उत्पादन, व्यवसायाबाबत मार्गदर्शन केले. डॉ. विक्रम कदम यांनी जनावरांचे आरोग्य सुधारण्याच्या दृष्टीने चारा लागवड करण्याचे आवाहन यावेळी केले. कृषी पर्यवेक्षक मसराम यांनी ठिबक व तुषार सिंचन योजनेबाबत मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन व आभार किशोर सरदारे यांनी मानले. यावेळी बहुसंख्य शेतकरी उपस्थित होते.