जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे बेमुदत उपोषण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2018 12:19 AM2018-03-16T00:19:09+5:302018-03-16T00:19:09+5:30

शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील जवळपास ३५० शिक्षक उपस्थित होते.

Incessant fasting of teachers in front of Zilla Parishad | जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे बेमुदत उपोषण

जिल्हा परिषदेसमोर शिक्षकांचे बेमुदत उपोषण

Next
ठळक मुद्देशिक्षक समितीचा पुढाकार : जवळपास ३५० शिक्षकांची हजेरी

ऑनलाईन लोकमत
गडचिरोली : शिक्षकांच्या विविध मागण्यांसाठी शिक्षक समितीच्या पदाधिकाऱ्यांनी १५ मार्चपासून गडचिरोली जिल्हा परिषदेसमोर बेमुदत उपोषणाला सुरूवात केली आहे. आंदोलनाच्या पहिल्या दिवशी जिल्हाभरातील जवळपास ३५० शिक्षक उपस्थित होते. शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष धनपाल मिसार यांनी बेमुदत उपोषण सुरू केले आहे.
सेवानिवृत्तीच्या दिवशी सेवानिवृत्त कर्मचाऱ्याला सर्व लाभ घेऊन आनंदी सेवानिवृत्ती दिन साजरा करावा, चटोपाध्याय आयोगाच्या शिफारशीनुसार वरिष्ठ वेतन श्रेणी व प्रलंबित निवड श्रेणीची प्रकरणे मंजूर करावी, स्थायी व नियमितचे प्रकरण त्वरीत निकाली काढावी, २९० स्वच्छतागृहाच्या बांधकामाचा अंतिम हप्ता त्वरीत द्यावा, अंशदायी पेन्शन योजनेचा जमा रकमेचा ताळमेळ जुळवून हिशोब द्यावा, रिक्त असलेली शिक्षण विस्तार अधिकारी पदे प्राथमिक शिक्षक संवर्गातून पदोन्नतीने भरावी, एकस्तर पदोन्नतीची वेतनश्रेणी विकल्पानुसार सुरू ठेवावी, वसुली थांबविण्यात यावी, पदावनत केलेल्या उच्च श्रेणीत मुख्याध्यापकांना १ ते ७ च्या शाळेत मुख्याध्यापक पदावर समायोजित करावे, निलंबित शिक्षकांना पुन्हा स्थापीत करावे, सेवा पुस्तक पडताळणीसाठी पंचायत समितीस्तरावर शिबिर आयोजित करावे, शिक्षकांचे वेतन दरमहा १ तारखेला देण्यात यावे आदी प्रमुख १८ मागण्यांसाठी आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनात गुरूवारी प्रामुख्याने रमेश रामटेके, फरेंद्र कोत्तावार, योगेश ढोरे, माया दिवटे, अरूण पुण्यप्रेडीवार, अशोक दहागावकर, गणेश काटेंगे, हेमंत मेश्राम, सुरेश नाईक, देवाजी तिम्मा, मेघराज बुरांडे, खिरेंद्र बांबोळे, राजेश बाळराजे, जयंत राऊत, रवींद्र मुलकलवार, डंबाजी पेंदाम, मनोज रोकडे, लक्ष्मण गद्देवार, शिवाजी जाधव, नरेश चौधरी, संजय लोणारे, प्रेमचंद मेश्राम, शेषराज संगीडवार, संगीता लाकडे, राकेश सोनटक्के, रोशनी राकडे, प्रभाकर गडपायले, जीवन शिवणकर, गुणवंत हेडाऊत, गुलाब मने, केशव परवते, रामजी धोडे, रामदास मसराम दिलीप नाकाडे, रवींद्र सोमनकर, सुरेश मडावी, वैशाली कोसे, दीपक रामने, मुबारक सय्यद, टार्जन सुरजागडे, ब्रह्मानंद उईके, आनंद गुरनुले, रवींद्र वासेकर, कैलास टेंभुर्णे, बंडू सिडाम, साईनाथ अलोणे, प्रमोद जक्कनवार, खुशाल चुधरी उपस्थित होते.

Web Title: Incessant fasting of teachers in front of Zilla Parishad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.