मालवाहतुकीतून एसटीला आठ लाख रुपयांचे उत्पन्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2020 05:00 AM2020-07-20T05:00:00+5:302020-07-20T05:00:40+5:30
लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने चालण्याची शक्यता आहे. तोपर्यंत एसटीची प्रवाशी वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे. लाखो एसटी कर्मचाऱ्यांना काम उरले नाही.
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : मागील दोन महिन्यांपासून राज्य परिवहन महामंडळाने राज्यभरात माल वाहतुकीला सुरूवात केली आहे. गडचिरोली विभागाने मागील दोन महिन्यात ८ लाख २६ हजार रुपयांचे उत्पन्न मिळविले आहे. प्रवाशी वाहतुकीच्या तुलनेत सदर उत्पन्न अतिशय कमी असले तरी एसटीचा तोटा कमी करून कर्मचाऱ्यांना रोजगार देण्याचा प्रयत्न या माध्यमातून सुरू झाला असल्याचे दिसून येत आहे.
लॉकडाऊनच्या कालावधीत सार्वजनिक वाहतुकीला शासनाने प्रतिबंध घातला. २२ मार्चपासून एसटीची चाके थांबली आहेत. जिल्हांतर्गत बससेवेला परवानगी देण्यात आली. त्यानुसार बसफेऱ्या चालविल्या जात आहेत. मात्र प्रवाशी मिळणे कठीण झाले आहे. कोरोनाची साथ आणखी काही महिने चालण्याची शक्यता आहे. तोपर्यंत एसटीची प्रवाशी वाहतूक बंदच राहण्याची शक्यता आहे. लाखो एसटी कर्मचाऱ्यांना काम उरले नाही.
एसटीकडे काही जुनी वाहने आहेत. सदर वाहने प्रवाशी वाहतुकीसाठी वापरण्यास परवानगी नसली तरी मालवाहतुकीसाठी सदर वाहने वापरता येणे शक्य असल्याने या वाहनांच्या मदतीने मालवाहतूक करण्याची संकल्पना एसटीने पुढे आणली. जून महिन्यापासून माल वाहतुकीला सुरूवात झाली. जून महिन्यात ४ लाख २७ हजार ४१७ रुपयांचे उत्पन्न मिळाले. तर जुलै महिन्यात ३ लाख ९८ हजार ९३५ रुपयांचे उत्पन्न आजपर्यंत मिळाले आहे. गडचिरोली विभागाकडे असलेल्या १४ ट्रकच्या माध्यमातून माल वाहतूक केली जात आहे.
फाटलेली ठिगळं शिवण्याचा प्रयत्न
लॉकडाऊनमुळे प्रवाशी वाहतुकीपासून मिळणारे उत्पन्न नाहीच्या बरोबर आहे. कर्मचाºयांचे वेतन व इतर खर्च कायम असताना उत्पन्न मात्र बंद आहे. त्यामुळे एसटीचा तोटा वाढत आहे. अशातच एसटीने माल वाहतुकीच्या माध्यमातून उत्पन्न मिळविण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. मात्र त्याला तुर्तास तरी अपेक्षित यश मिळाले नसल्याचे दिसून येत आहे. माल वाहतुकीच्या क्षेत्रात एसटी नवीन आहे. अधिकारी व कर्मचाºयांना फारसा अनुभव नाही. त्यामुळे पाहिजे त्या प्रमाणात माल वाहतुकीसाठी आॅर्डर मिळाल्या नाही. मात्र अनुभवातून शिकून एसटी माल वाहतुकीच्याही क्षेत्रात आपले पाय घट्ट रोवेल, असा विश्वास एसटीच्या अधिकाºयांनी व्यक्त केला.