मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 20, 2019 12:20 AM2019-06-20T00:20:30+5:302019-06-20T00:21:56+5:30

राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले.

Increase in fish and vegetable production | मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

मासे व भाजीपाला उत्पादनात वाढ

Next
ठळक मुद्देशाश्वत शेती : आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांमुळे २१५४ एकर शेतीला सिंचन

लोकमत न्यूज नेटवर्क
वैरागड : राज्यातील काही भागात निर्माण होणारी पाणीटंचाई लक्षात घेऊन राज्य सरकारने जलयुक्त शिवार योजना अंमलात आणली. या योजनेचे सकारात्मक फायदे सर्वत्र पाहावयास मिळाले. आरमोरी तालुक्यात ७१८ शेततळ्यांची निर्मिती झाल्याने २ हजार १५४ एकर शेती क्षेत्र सिंचनाखाली आले. शिवाय मत्स्यपालन व भाजीपाला लागवडीतही भरघोस वाढ झाली.
शेततळ्यांमुळे खरीप व रबी हंगामातील पिकाला सिंचनाची सोय उपलब्ध झाली. एवढेच नव्हे तर आरमोरी तालुक्यातील शंकरनगर, देविपूर, वडधा या गावातील शेतकऱ्यांनी आपल्या शेतातील शेततळ्यात मत्स्यबीज टाकून मत्स्यपालनसुद्धा करून आर्थिकदृष्ट्या नफ्याची शेती केली आहे. शेततळ्यासाठी १२ आर क्षेत्र लागत असून शेततळ्याच्या पाळीवरील ६ आर जागेत तुरीचे पीक घेतले जात आहे. त्यामुळे शेततळ्यात अत्यल्प क्षेत्र कामी लागत आहे.
शेततळ्यांमुळे पावसाचे वाहून जाणारे पाणी अडते. तसेच आवश्यकतेनुसार पिकाला पाणीसुद्धा देता येते. त्यामुळे शेततळे विविध पिकांसाठी वरदान ठरत आहे. तालुक्यातील अन्य ठिकाणीसुद्धा शेततळ्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्यामुळे शेतकरी मत्स्यपालनासह भाजीपाला लागवडीकडे अधिक लक्ष देत आहेत. तालुक्यातील १०३ गावांमध्ये शेततळ्यांचे काम झाले आहे.
अपुºया व अनियमित पावसामुळे शेतकऱ्यांचे पीक अंतिम टप्प्यात पावसाअभावी नष्ट होते. अथवा अत्यल्प उत्पादन मिळते. निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून न राहता शेतकºयांनी शासकीय योजनांच्या लाभातून सिंचन सुविधा निर्माण करावी.
- एस. पी. ढोणे, तालुका कृषी अधिकारी., आरमोरी

Web Title: Increase in fish and vegetable production

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी