इंधन दरवाढीने चिखलणीचे भाडे वधारले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2021 04:30 AM2021-07-25T04:30:46+5:302021-07-25T04:30:46+5:30
शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण आल्याने प्रत्येक शेतकरी आता ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या माध्यमातून शेती कसत आहे. आधुनिक शेतीसाठी डिझेल, पेट्रोल ...
शेती क्षेत्रात यांत्रिकीकरण आल्याने प्रत्येक शेतकरी आता ट्रॅक्टर व पाॅवर टिलरच्या माध्यमातून शेती कसत आहे. आधुनिक शेतीसाठी डिझेल, पेट्रोल वापरल्याने खर्च जादा व वेळ कमी लागत आहे. मागील वर्षी डिझेलचे भाव यंदापेक्षा कमी हाेते. त्यामुळे नांगरणीचे दर ७०० ते ८०० रुपये हाेते. परंतु यावर्षी दर वाढल्याने २०० ते २५० रुपयांची अतिरिक्त दरवाढ झाली आहे. त्यामुळे यंदा शेतकऱ्यांचे बजेट ५ ते १० हजार रुपयांनी वाढले आहे. इंधन दरवाढ मागे घ्यावी यासाठी लाेकप्रतिनिधींनी केंद्र सरकारकडे मागणी करून प्रयत्न करणे आवश्यक आहे.
प्रतिक्रिया
मागील वर्षी चिखलणीचे दर प्रती तास ८०० रुपये होते; मात्र यावर्षी इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर मालकांनी प्रती तास भाडे १,००० ते १,१०० रुपये केले आहे. त्यामुळे यावर्षी एकूण खर्चात भरपूर वाढ हाेणार आहे. अतिरिक्त खर्च न परवडणारा आहे. एक तर शासन धानाला या तुलनेत भाव देत नाही. तर हा अतिरिक्त खर्च कसा भागवायचा.
श्रीरंग मशाखेत्री, शेतकरी भेंडाळा