सेवेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:25+5:302021-09-13T04:35:25+5:30

गडचिराेली : तब्बल एक महिना संघटनेच्या नेतृत्वात संप केल्यानंतर शासनाने राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेनुसार मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. ...

Increase the honorarium of Anganwadi staff according to the service | सेवेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा

सेवेनुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधनात वाढ करा

Next

गडचिराेली : तब्बल एक महिना संघटनेच्या नेतृत्वात संप केल्यानंतर शासनाने राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना सेवेनुसार मानधनात वाढ करण्याचा निर्णय घेतला. मात्र, अजूनही सेवेनुसार अंगणवाडी सेविका व मदतनिसांच्या मानधनात वाढ करण्यात आली नाही. ही वाढ तातडीने अदा करण्यात यावी, अशी मागणी अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी केली आहे. घेतलेला निर्णय कागदावरच असल्याचा आराेपही कर्मचाऱ्यांनी केला आहे.

१०, २० व ३० वर्षांपेक्षा जास्त काळ कर्तव्य बजावलेल्या अंगणवाडी सेविका व मदतनीस तसेच मिनी अंगणवाडी सेविकांच्या मानधनात वाढ करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. मात्र, ही वाढ अजूनही देण्यात आली नाही. पाेषण ट्रॅकर ॲपमध्ये इंग्रजीतून माहिती भरण्याचे आदेश शासनाने काढले आहेत. मात्र, बऱ्याच अंगणवाडी महिला अल्पशिक्षित असल्याने इंग्रजीतून माहिती भरताना त्यांना अडचणी येत आहेत. त्यामुळे इंग्रजीतून माहिती भरण्याची सक्ती त्यांना करू नये. सेवानिवृत्तीचा लाभ देण्याचे शासनाने घाेषित केले हाेते; परंतु अंगणवाडी सेविका तसेच मदतनीस सेवानिवृत्त हाेऊनही त्यांना सेवानिवृत्तीचा लाभ अजूनही मिळाला नाही. जे अंगणवाडी केंद्र भाड्याच्या खाेलीत आहेत, त्यांना भाड्याचे पैसे मिळाले नाही. गेल्या तीन वर्षांपासून कर्मचाऱ्यांचे टीए बिल प्रलंबित आहे.

शासनाने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या समस्या साेडवाव्या, अशी मागणी कर्मचाऱ्यांनी केली आहे.

Web Title: Increase the honorarium of Anganwadi staff according to the service

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.