यांत्रिक शेती केल्यास उत्पन्नात भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 9, 2021 04:45 AM2021-06-09T04:45:16+5:302021-06-09T04:45:16+5:30
देसाईगंज : शेतकरीबांधवांनी परंपरागत कृषी औजारांसाेबत ट्रॅक्टरसारख्या यांत्रिक साधनांचा वापर करावा. यांत्रिक शेती केल्यास वेळ, श्रम व पैसा वाचून ...
देसाईगंज : शेतकरीबांधवांनी परंपरागत कृषी औजारांसाेबत ट्रॅक्टरसारख्या यांत्रिक साधनांचा वापर करावा. यांत्रिक शेती केल्यास वेळ, श्रम व पैसा वाचून उत्पन्नात भर पडून शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटाेले यांनी केले. देसाईगंज येथे रासेकर ट्रॅक्टर्सच्यावतीने सोमवारी झालेल्या शेतकरी मेळाव्यात ते बाेलत हाेते.
पटाेले पुढे म्हणाले, राज्य शासनाच्या कृषी विभागाद्वारे शेतकऱ्यांसाठी विविध याेजना राबविल्या जातात. त्याचा लाभ घेऊन शेतकऱ्यांनी बदलत्या पीकपद्धतीचा अवलंब करून परंपरागत पिकांसाेबतच ग्राहकांच्या मागणीनुसार उत्पन्न काढल्यास आर्थिक स्रोत वाढून आत्मनिर्भरता वाढेल.
राज्याचे मदत व पुनर्वसनमंत्री विजय वडेट्टीवार म्हणाले, बदलत्या काळानुसार कमी वेळ व खर्चात शेती करून अधिक उत्पन्न वाढविण्यासाठी शेतकऱ्यांनी यांत्रिकी पद्धतीने शेती करावी. नवीन तंत्रज्ञानाचा वापर करता यावा, म्हणून शासनाने विविध याेजना सुरू केल्या आहेत. त्याचा लाभ शेतकऱ्यांनी घ्यावा. दरम्यान, यावेळी ना.वडेट्टीवार यांनी शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
या शेतकरी मेळाव्याला आ.अभिजित वंजारी, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष डाॅ.नामदेव उसेंडी, अविनाश वारजूरकर, रवींद्र दरेकर, जेसा माेटवानी, नगरसेवक गणेश फाफट, आरिफ खानानी, हरिष माेटवानी, डाॅ.प्रमाेद साळवे, मेळाव्याचे आयाेजक गणेश रासेकर, राजू रासेकर उपस्थित हाेते. (वाणिज्य वार्ता)
===Photopath===
080621\08gad_1_08062021_30.jpg
===Caption===
कार्यक्रमाला उपस्थित आ. नाना पटाेले, ना. विजय वडेट्टीवार, आ. अभिजित वंजारी.