पट्टे वाटपाची गती वाढवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 31, 2019 11:00 PM2019-01-31T23:00:48+5:302019-01-31T23:01:12+5:30

पात्र शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे वितरित करावे, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने चामोर्शी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.

Increase the lease distribution speed | पट्टे वाटपाची गती वाढवा

पट्टे वाटपाची गती वाढवा

Next
ठळक मुद्देनिवेदनातून मागणी : बीआरएसपीचे पंचायत समितीसमोर धरणे आंदोलन

लोकमत न्यूज नेटवर्क
चामोर्शी : पात्र शेतकऱ्यांना शेतजमिनीचे पट्टे वितरित करावे, यासह इतर मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टीच्या वतीने चामोर्शी पंचायत समिती समोर धरणे आंदोलन करण्यात आले.
घरकुल योजना तसेच रमाई आवास योजनेअंतर्गत प्रत्येक पात्र कुटुंबाला घरकुलाचा लाभ देण्यात यावा, नवीन कुटुंबांचाही घरकूल लाभार्थ्यांच्या यादीत समावेश करावा, आष्टी पेपर मिल पूर्ववत सुरू करावी, कर्जमाफीची घोषणा शासनामार्फत करण्यात आली. मात्र वर्षभराचा कालावधी उलटूनही अजूनपर्यंत काही शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळाला नाही. धानाला योग्य तो हमीभाव देण्यात यावा, नागरिकांना जळाऊ लाकूड उपलब्ध करून द्यावे, शिष्यवृत्तीची रक्कम द्यावी, डीबीटीची अट रद्द करावी, चामोर्शी येथे क्रीडा संकूल त्वरित उभारावे, लोहखनिजाचा कारखाना जिल्ह्यातच सुरू करावा, चामोर्शी येथे बसस्थानक निर्माण करावे, जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना रोजगार द्यावा, चामोर्शी रुग्णालयाला उपजिल्हा रुग्णालयाचा दर्जा द्यावा, पेसा कायद्याची अंमलबजावणी करावी आदी मागण्यांसाठी बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी तर्फे चामोर्शी पंचायत समिती कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आले.
आंदोलनाचे नेतृत्व बीआरएसपीचे जिल्हाध्यक्ष राज बन्सोड, महासचिव सदाशिव निमगडे, गडचिरोली विधानसभा अध्यक्ष पुरूषोत्तम रामटेके, उपाध्यक्ष मिलिंद बांबोळे, आरमोरी विधानसभा अध्यक्ष सचिन गेडाम, सदस्य श्रीधर भगत, सचिव जितेंद्र बांबोळे, देवा वनकर, दिलीप बोलिवार, गोकूल ढवळे यांनी केले. मागण्यांचे निवेदन तहसीलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले. मागण्यांसंदर्भात तहसीलदारांशी चर्चा केली.

Web Title: Increase the lease distribution speed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.