अमृत आहार लाभार्थी अनुदान वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 10, 2021 04:44 AM2021-09-10T04:44:17+5:302021-09-10T04:44:17+5:30
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लल्ला उंदीरवाडे हाेत्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित हाेते. प्रास्ताविकातून विमल कमरो म्हणाल्या, ...
मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी लल्ला उंदीरवाडे हाेत्या. यावेळी मार्गदर्शक म्हणून संघटनेचे अध्यक्ष प्रा. रमेशचंद्र दहिवडे उपस्थित हाेते. प्रास्ताविकातून विमल कमरो म्हणाल्या, सतत महागाई वाढत आहे. तेल तथा डाळींच्या किमती दुप्पट झाल्या आहेत. अमृत आहार ३५ रुपयात देणे शक्य होत नाही. त्यामुळे त्यात वाढ करुन प्रती लाभार्थी ५० रुपये देण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली. प्रा. दहीवडे म्हणाले, महागाई तथा बेरोजगारीला आळा बसला नाही तर परिस्थिती आवाक्याबाहेर गेल्याशिवाय राहणार नाही. समान कामास समान वेतन हा सिद्धांत कागदावरच राहिला असून, शासनस्तरावरील काम ठेका पद्धतीने अर्ध्या वेतनावर करून घेतले जात आहे. या अन्यायाच्या विरोधात कर्मचारी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाहीत, असा इशारा त्यांनी दिला.
कार्यक्रमाचे आभार प्रमिला सलाम यांनी मानले. याप्रसंगी आशा भोवते, पुष्पलता नरोटे, कुसुम कवडाे, योगिता कोरेटी, यशोधरा उईके, वनिता नैताम, संगीता वालदे, नीलिमा हिडामी उपस्थित होत्या.