शाखा कार्यालयाच्या माध्यमातून जनसंपर्क व पक्षाची महती वाढवा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:39 AM2021-08-22T04:39:39+5:302021-08-22T04:39:39+5:30
आरमाेरी येथे युवासेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रामुख्याने युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, नीलेश ...
आरमाेरी येथे युवासेना कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी ते बाेलत हाेते. याप्रसंगी प्रामुख्याने युवासेना कार्यकारिणी सदस्य रूपेश कदम, नीलेश हेलोंडे उपस्थित हाेते. युवासेनेचे वरिष्ठ पदाधिकारी संवाद मोहिमेसाठी शुक्रवारला जिल्हा दौऱ्यावर आले हाेते. यावेळी सरदेसाई यांच्या हस्ते आरमोरी येथील युवासेनेच्या कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले. आगामी येणाऱ्या पंचायत समिती निवडणुका लक्षात घेता आपणाला आतापासूनच कामाला लागायचे आहे. येत्या निवडणुकांमध्ये फक्त भगवाच फडकेल, हेच आपले ध्येय असणार असल्याचे सरदेसाई यांनी सांगितले.
गडचिरोलीच्या कोनाकोपऱ्यात युवासेना पसरली असून, नक्षलग्रस्त भागात युवतीसेना सक्रिय आहे. मागास जिल्हा असल्याने या जिल्ह्यासाठी शासनातर्फे विविध योजना राबविल्या जातात. जनतेचे काम करताना कोणतीही अडचण निर्माण झाल्यास मला सांगा. तिचे निराकरण करू, आपण आपल्या कार्यकर्त्यांसाठी व जनतेसाठीच आहोत, असे सरदेसाई यांनी सांगितले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने शेकडो तरुणांनी शिवबंधन बांधून युवासेनेत प्रवेश केला.
यावेळी कार्यक्रमाला शिवसेना जिल्हाप्रमुख सुरेंद्रसिंह चंदेल सिंग, माजी युवासेना जिल्हाप्रमुख चंदू बेहरे, संपर्कप्रमुख किशोर पोद्दार, उपजिल्हाप्रमुख अरविंद कात्रटवार, उपजिल्हाप्रमुख अविनाश गेडाम, माजी पंस सभापती चंद्रशेखर मने, बांधकाम सभापती सागर मने, भूषण सातव, उमा चंदेल, नगरसेवक माणिक भोयर, कवडू सहारे, लहानू पिलारे, राजाभाऊ ढोरे, पुंजीराम मेश्राम, रामदास डोंगरवार, अक्षय धकाते, योगेश देवीकर, शैलेश ढोरे, उल्लास बनपूरकर, सचिन बोदनकार, कवीश्वर खोब्रागडे, लाकडे पाटील, किशोर मेश्राम, टीकाराम खेवले, शैलेश चिटमलवार, अक्षय चाचरकर व शिवसेना, युवासेना-युवतीसेनेचे शेकडाे कार्यकर्ते उपस्थित होते.