उपस्थिती टिकवून गुणवत्ता वाढवा
By admin | Published: June 23, 2017 12:56 AM2017-06-23T00:56:24+5:302017-06-23T00:56:24+5:30
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आगामी सत्रात टिकून राहिली पाहिजे,
शिक्षकांचे प्रशिक्षण : रवींद्र रमतकर यांचे आवाहन
लोकमत न्यूज नेटवर्क
गडचिरोली : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थी उपस्थिती आगामी सत्रात टिकून राहिली पाहिजे, गुणवत्ता कशी वाढेल, याचा विचार शिक्षकांनी करून त्यापद्धतीने वाटचाल केली पाहिजे, असे आवाहन डायटचे प्राचार्य रवींद्र रमतकर यांनी केले.
आरएमएसए अंतर्गत इयत्ता नववीच्या विद्यार्थ्यांना भाषा, गणित, इंग्रजी व विज्ञान विषय शिकविणाऱ्या शिक्षकांचे प्रशिक्षण जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था इंदाळा येथे पार वडले. यावेळी ते बोलत होते. यावेळी मंचावर डायटचे ज्येष्ठ अधीव्याख्याता मत्ते, साळवे, रत्नागिरी, कासर्लावार, घुगरे, वागधरे, ब्राम्हणवाडे आदी उपस्थित होते. याप्रसंगी प्रा. मत्ते म्हणाले, अध्यापनात माहिती तंत्रज्ञानाचा वापर करून अध्यापन कसे रंजन करता येईल, यादृष्टीने शिक्षकांनी प्रयत्न करावे. माध्यमिक स्तरावरील गुणवत्ता विकासासाठी पोषक वातावरण तयार करणे, विद्यार्थ्यांची गळती शून्य टक्क्यावर आणणे, शिक्षकाना तंत्रस्नेही बनविणे हा या प्रशिक्षणामागील प्रमुख उद्देश आहे. सदर प्रशिक्षणात एकूण ४५ प्रशिक्षणार्थी, शिक्षक उपस्थित होते. प्रशिक्षणाचा दुसरा टप्पा २४ व २५ जून रोजी तर तिसरा टप्पा १ व २ जुलै आणि चवथा टप्पा ८ व ९ जुलै रोजी घेण्यात येणार आहे. सदर प्रशिक्षणाला शिक्षकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन करण्यात आले.