तलावातील जलसाठ्यात वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 1, 2018 12:57 AM2018-01-01T00:57:26+5:302018-01-01T00:57:36+5:30

जि. प. सिंचाई उपविभागांतर्गत कुरखेडा व कोरची तालुक्यात माजी मालगुजारी तलावातील गाळाचा उपसा उन्हाळ्यात करण्यात आला. यामुळे मामा तलावातील जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ झाली आहे.

 Increase in the storage in the ponds | तलावातील जलसाठ्यात वाढ

तलावातील जलसाठ्यात वाढ

googlenewsNext
ठळक मुद्दे कुरखेडा उपविभाग : २३ मामा तलावातील गाळाचा उपसा झाल्याचा परिणाम

लोकमत न्यूज नेटवर्क
कुरखेडा : जि. प. सिंचाई उपविभागांतर्गत कुरखेडा व कोरची तालुक्यात माजी मालगुजारी तलावातील गाळाचा उपसा उन्हाळ्यात करण्यात आला. यामुळे मामा तलावातील जलसाठ्याच्या साठवणूक क्षमतेत वाढ झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्यात १ हजार ६४१ मामा तलाव अस्तित्त्वात आहेत. मामा तलावांची देखभाल व दुरूस्ती जिल्हा परिषदेच्या लघु पाटबंधारे विभागामार्फत करण्यात आली. यापैैकी अनेक तलावांची निर्मिती झाल्यापासून तलावात येणाºया येव्या सोबतच पावसाळ्यात वाहून येणाºया मातीमुळे अनेक तलाव उथळ झाले. त्यामुळे तलावांची पाणी साठवणूक क्षमता कमी झाली. याचा परिणाम सिंचनावर झाला. अनेक बऱ्याचशा तलावाच्या बुडीत क्षेत्रात शेतकºयांनी अतिक्रमण केल्यामुळे तलावाचे अस्तित्त्व धोक्यात आले आहे. यावर उपाययोजना म्हणून मामा तलाव पुनरूज्जीवन करण्याचे काम शासनाने हाती घेतले आहे. त्यानुसार २०१६-१७ मध्ये सर्वंकष दुरूस्ती अंतर्गत लघु पाटबंधारे विभाग जि. प. गडचिरोली यांच्या मार्फतीने १५८ तलावांची कामे हाती घेण्यात आली. यामध्ये तलावाच्या मूळ बुडीत क्षेत्राची तालुका भूमिअभिलेख यांच्या मार्फतीने मोजणी करून तलावातील अतिक्रमण काढण्यात येऊन दुरूस्तीची कामे करण्यात आली.
जलयुक्त शिवार अभियान, महात्मा फुले जलभूमी अभियान व महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत तलावातील गाळ काढून तलावाची साठवणूक क्षमता वाढविण्यात येत आहे. २०१७-१८ मध्ये जिल्हा परिषद लघु पाटबंधारे विभागाच्या वतीने विशेष निधी पुरविण्यात आला. त्या अनुषंगाने जिल्ह्यात ७३ कामे हाती घेण्यात आली. यापैैकी जिल्हा परिषद सिंचाई उपविभाग कुरखेडा यांच्या मार्फतीने कुरखेडा तालुक्यात १५ कामे व कोरची तालुक्यात ८ कामे पूर्ण करण्यात आली. या कामांमुळे मामा तलावातील साठवणूक क्षमता वाढून सिंचन क्षेत्रही विस्तारले आहे.
पूरक व्यवसायांसाठी तलावांची आवश्यकता
वन कायद्यामुळे जिल्ह्यात सिंचनाचे अनेक प्रकल्प रखडले आहेत. सिंचनाच्या सुविधा उपलब्ध व्हाव्या, याकरिता मामा तलावांची निर्मिती आवश्यकता आहे. जि. प. च्या सिंचाई विभागामार्फत तलावातील गाळ उपसा करण्याचे काम होत असल्याने तलावातील पाणीसाठा वाढून येथे मत्स्य व्यवसाय, सिंगाडा लागवड व अन्य व्यवसायास बळ मिळेल.

Web Title:  Increase in the storage in the ponds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.