वर्दळीच्या रस्त्यांवर वाढले अतिक्रमण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:39 AM2021-08-23T04:39:03+5:302021-08-23T04:39:03+5:30
निराधार योजनेचे अनुदान प्रलंबित रांगी : मागील दाेन ते तीन महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी लाभार्थींना ...
निराधार योजनेचे अनुदान प्रलंबित
रांगी : मागील दाेन ते तीन महिन्यांपासून श्रावणबाळ निवृत्तिवेतन योजनेचे अनुदान थकीत आहे. परिणामी लाभार्थींना अडचणीचे होत आहे. कोरोनामुळे लाभार्थींना आर्थिक चणचण भासत आहे. लाभार्थी पैशांसाठी बँकेत रोज चकरा मारत आहेत, मात्र पैसे आले नसल्याने त्यांना आल्यापावली परत फिरावे लागत आहे. सातत्याने मागणी करूनही निराधार याेजनेच्या अनुदानाच्या कामात गती आलेली नाही. पैसे थकीत राहात असल्याने लाभार्थींना मानसिक त्रास सहन करावा लागत आहे.
राजस्व अभियान सुरू ठेवण्याची मागणी
जाेगीसाखरा : तालुका प्रशासनाच्या वतीने तहसील कार्यालयात राजस्व अभियान राबविण्यात येत होते. या अभियानामुळे परिसरातील नागरिकांना विविध प्रकारची प्रमाणपत्रे वाटप करण्यात आली. तहसील कार्यालयातील दैनंदिन कामकाजामुळे अनेक प्रमाणपत्रे वेळेवर मिळत नाहीत. आता शाळा, महाविद्यालये सुरू झाल्याने त्यांना कागदपत्रे लागणार आहेत. दुर्गम भागातील नागरिक प्रमाणपत्रांच्या प्रतीक्षेत आहेत.
ग्रामीण भागात विजेचा लपंडाव
कुरुड (काेंढाळा) : सध्या ग्रामीण भागातील अनेक गावांत विजेचा लपंडाव सुरू असून, त्यामुळे नागरिकांना त्रास होत आहे. तसेच अनेक विद्युततारा लोंबकळत्या स्थितीत आहेत. त्यामुळे थोडा वारा आला तरी विद्युतपुरवठा खंडित होतो. कृषिपंपधारक शेतकरी रब्बी पिकांची तयारी करीत आहे. अशावेळी अखंडित वीजपुरवठा करणे गरजेचे आहे. वीज वितरण कंपनीने याकडे तातडीने लक्ष देण्याची मागणी गावकऱ्यांनी केली आहे.