व्हायरल सर्दी-तापाचे प्रमाण वाढले; रुग्णालयांमध्ये बाल रुग्णांची गर्दी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2021 04:35 AM2021-09-13T04:35:42+5:302021-09-13T04:35:42+5:30

बाॅक्स ... अशी घ्या काळजी वातावरणातील बदलामुळे सध्या बालरुग्णसंख्या जिल्ह्यात वाढली आहे. सर्दी, ताप, खाेकला आदीने त्रस्त असलेले बालरुग्ण ...

Increased viral cold-fever; Crowds of pediatric patients in hospitals | व्हायरल सर्दी-तापाचे प्रमाण वाढले; रुग्णालयांमध्ये बाल रुग्णांची गर्दी

व्हायरल सर्दी-तापाचे प्रमाण वाढले; रुग्णालयांमध्ये बाल रुग्णांची गर्दी

Next

बाॅक्स ...

अशी घ्या काळजी

वातावरणातील बदलामुळे सध्या बालरुग्णसंख्या जिल्ह्यात वाढली आहे. सर्दी, ताप, खाेकला आदीने त्रस्त असलेले बालरुग्ण उपचारासाठी येत आहेत. तसेच जिल्ह्यात यापूर्वी डेंग्यूसदृश आजाराचे रुग्ण आढळून आले. सर्वच पालकांनी आपल्या मुला-मुलींच्या स्वच्छतेबाबत विशेष काळजी घ्यावी. शिवाय काेराेनाच्या नियमाचे पालन करावे, पाल्यांची प्रकृती बिघडल्यास तत्काळ तज्ज्ञ डाॅक्टरांना दाखवावे.

- डाॅ. निखिल चव्हाण, बालराेगतज्ज्ञ, गडचिराेली

बाॅक्स ..

शासकीय ओपीडीतही दरराेज रुग्ण

गडचिराेली येथील इंदिरा गांधी रुग्णालयात औषधाेपचारासाठी येणाऱ्या रुग्णांची संख्या माेठी आहे. सर्दी, ताप, खाेकला असलेले बरेच रुग्ण या रुग्णालयाच्या ओपीडीमध्ये औषधाेपचारासाठी येत आहेत. विशेष म्हणजे गडचिराेली जिल्ह्यासह लगतच्या चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातून येथे रूग्ण येत असल्याची माहिती आहे.

बाॅक्स ..

व्हायरल फिवर वाढले

अस्वच्छतेमुळे डेंग्यूची साथ वाढत असते. घर, परिसरात स्वच्छता ठेवणे गरजेचे आहे. शिवाय लहान मुलामुलींनी हात नेहमी स्वच्छ धुवावे जेणे करून अतिसार व उलटीसारखे आजार हाेणार नाही. जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी डेंग्यूची रुग्ण आढळले तेव्हापासून जिल्ह्याच्या आराेग्य विभागाची यंत्रणा सतर्क झाली आहे. उपाययाेजनेवर यंत्रणेचे पूर्ण लक्ष आहे. तापासह अतिसार व हिवतापाचे बालरुग्ण दिसून येत आहे. त्यामुळे पालक व नागरिक त्रस्त आहेत.

Web Title: Increased viral cold-fever; Crowds of pediatric patients in hospitals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.