स्वतंत्र अधीक्षिका, सुरक्षा रक्षक मिळणार

By Admin | Published: August 5, 2014 11:25 PM2014-08-05T23:25:25+5:302014-08-05T23:25:25+5:30

राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र महिला अधीक्षिका व पहारेकरी/ सुरक्षा रक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. कारण शासनाकडून या पद भरतीला

Independent superintendent, security guard will get | स्वतंत्र अधीक्षिका, सुरक्षा रक्षक मिळणार

स्वतंत्र अधीक्षिका, सुरक्षा रक्षक मिळणार

googlenewsNext

गडचिरोली : राज्यासह गडचिरोली जिल्ह्यातील अनुदानित आश्रमशाळांमध्ये स्वतंत्र महिला अधीक्षिका व पहारेकरी/ सुरक्षा रक्षक पदाची नियुक्ती करण्यात आली नाही. कारण शासनाकडून या पद भरतीला मान्यता मिळाली नव्हती. मात्र आदिवासी विकास विभागाने २३ जानेवारी २०१४ रोजी नवा शासन निर्णय काढून या दोन्ही पदांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे या पदांच्या भरती प्रक्रियेबाबत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयात हालचाली सुरू झाल्या आहेत. तसेच अनेक अनुदानित आश्रमशाळांनी महिला अधिक्षिका पद भरण्याच्या कारवाईला सुरूवात केली आहे. त्यामुळे आता प्रदीर्घ वर्षाच्या कालावधीनंतर जिल्ह्यातील एकूण १९ अनुदानित आश्रमशाळेत स्वतंत्र अधीक्षिका व सुरक्षा रक्षक मिळणार आहे.
आदिवासी विकास विभागामार्फत राज्यभरात एकूण ५५२ शासकीय आश्रमशाळा सुरू आहे. यात १२८ प्राथमिक तसेच ४२४ माध्यमिक आश्रमशाळांचा समावेश आहे. याच विभागामार्फत इंग्रजी माध्यमांच्या पब्लीक स्कूलच्या धर्तीवर ५ व इंग्रजी माध्यमांच्या ६ आश्रमशाळा सुरू आहेत. तसेच राज्यभरात ५५६ अनुदानित आश्रमशाळा सुरू आहे. या आश्रमशाळा स्वयंसेवी संस्थांमार्फत चालविल्या जात आहेत. यात ८९ प्राथमिक अनुदानित तर ४६७ माध्यमिक अनुदानित आश्रमशाळांचा समावेश आहे. शासकीय आश्रमशाळेत गेल्या अनेक दिवसांपासून अधीक्षिका व सुरक्षा रक्षकाचे पद भरण्यात आले आहे.
मात्र अनुदानित आश्रमशाळांमध्ये या पदांना मंजुरी मिळाली नसल्यामुळे या शाळांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र आदिवासी विभागाने अनुदानित आश्रमशाळेतील या पदांना भरतीकरिता मंजुरी दिल्यामुळे अनुदानित आश्रमशाळांचा मार्ग मोकळा झाला आहे. अधीक्षिका पद हे वेतनश्रेणीवर तर सुरक्षारक्षकाचे पद केवळ ३२०० रूपये मानधनावर भरण्याबाबत शासन निर्णयात तरतूद आहे. (स्थानिक प्रतिनिधी)

Web Title: Independent superintendent, security guard will get

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.